Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Agriculture Irrigation : दुष्काळी व मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी शेततळी वरदान ठरत आहेत.
Farm Pond
Farm PondAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : दुष्काळी व मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी शेततळी वरदान ठरत आहेत. कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत सन २०१५ पासून २०२४ या नऊ वर्षांत जिल्ह्यात तब्बल ४ हजार २६१ शेतकऱ्यांनी विविध आकाराची शेततळी खोदून विहिरि व विंधनविहीरींचे पाणी संपल्यानंतर या शेततळ्यांतील पाण्यातून पिकांचे हमखास उत्पादन घेतले आहे.

शेततळ्यातील पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी सूक्ष्म सिंचनाची जोड दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अजूनही शेततळ्यांना पसंती कायम आहे. शेततळी खोदण्याचा वेग अजूनही कायम आहे. दरम्यान सन २०२४- २०२५ या वर्षात शेततळ्यासाठी कृषी विभागाकडे जिल्ह्यातून शेतकऱ्यांचे एक हजार ९७० अर्ज आले आहेत.

Farm Pond
Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली चार हजार शेततळी

महाडीबीटी पोर्टलवर नव्याने आलेल्या या अर्जाची सोडत अजून निघालेली नाही. जून ते ऑक्टोबरदरम्यान शेततळी खोदण्यात शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे या कालावधीत आलेल्या अर्जाची सोडत काढलेली नाही. ही सोडत साधारण डिसेंबरमध्ये निघण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने या वर्षासाठी ५०९ शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात २०१५-२०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे योजना आली. त्याअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी शंभर टक्के अनुदानावर शेततळी खोदली. २०१५ ते २०२० पर्यंत जिल्ह्यात ३ हजार ९८१ शेततळी खोदली गेली. दरम्यान, ही योजना नंतर बंद झाली. तसेच, कोरोनामुळे २०२०-२१ मध्ये शेततळे योजना बंद राहिली.

Farm Pond
Farm Pond : शेतकऱ्याने खोदले २३ लाख लिटर क्षमतेचे शेततळे

त्यामुळे शेततळ्यांच्या कामांना थोडा ब्रेक लागला. मात्र, पुन्हा २०२२ पासून वैयक्तिक शेततळे योजनेअंतर्गत शेततळ्यांच्या कामांना वेग आलेला आहे. वैयक्तिक शेततळे योजनेअंतर्गत कृषी विभागाने २०२२- २३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ३९० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी २८१ शेततळी खोदून पूर्ण झाली आहेत.

या शेततळ्यांचे १ कोटी ६६ लाख ८१ हजार रुपयांचे अनुदानही वितरित करण्यात आले आहे. याशिवाय ७८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. तसेच पाच शेततळ्यांची कागपत्रे अपलोड झालेली नाहीत. ही कामेही लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे कृषी विभाग ३९० शेततळ्यांचे उद्दिष्ट लवकरच गाठणार आहे. मागील दोन वर्षात सर्वाधिक १२४ शेततळी कळंब तालुक्यात तर सर्वात कमी १४ शेततळी वाशी तालुक्यात घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com