
Akola News : जून महिन्यात पावसाने सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात हजेरी दिली आहे. या महिन्यात अकोला जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३६.९ मिलिमीटर आहे. यंदा महिन्यात १५५.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ११३.८ टक्के आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
अकोट तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १२४.५ मिमी आहे. या तालुक्यात यंदा जून महिन्यात १५३.६ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १२३.३ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १८०.८ मिमी (सरासरीच्या १४५.१ टक्के) होते. तेल्हारा तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १२० मिमी आहे. तेल्हारा तालुक्यात यंदा जून महिन्यात १६३.२ मिमी पाऊस झाला आहे.
हा पाऊस सरासरीच्या १३६.१ टक्के आहे. गतवर्षी जूनमध्ये हेच प्रमाण १३४.२ मिमी (सरासरीच्या १११.९ टक्के) होते. बाळापूर तालुक्यात सरासरी पर्जन्यमान १३०.१ मिमी व तालुक्यात यंदा जूनमध्ये १७१.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १३२ टक्के आहे. गतवर्षी जूनमध्ये हेच प्रमाण १२४.६ मिमी (सरासरीच्या ९५.८ टक्के) होते.
पातूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १५५.६ मिमी व तालुक्यात यंदा जूनमध्ये २१८.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १४०.३ टक्के आहे. गतवर्षी जूनमध्ये हेच प्रमाण १७१.४ मिमी (सरासरीच्या ११०.२ टक्के) होते.
अकोला तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १३४ मिमी व तालुक्यात यंदा जून महिन्यात १३१.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ९८.४ टक्के आहे. गतवर्षी जूनमध्ये हेच प्रमाण १११.९ मिमी (सरासरीच्या ८३.५ टक्के) होते.
बार्शी टाकळी तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १४८.१ मिमी आहे. तालुक्यात यंदा जूनमध्ये १८०.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १२२.१ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३३.६ मिमी (सरासरीच्या ९०.२ टक्के) होते.
तर मूर्तिजापूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १४५.८ मिमी असून तालुक्यात यंदा जूनमध्ये ११८.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ८१.१ टक्के आहे. गतवर्षी जूनमध्ये हेच प्रमाण १३८.५ मिमी (सरासरीच्या ९५ टक्के) होते. जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात जून महिन्यात सरासरीही गाठता आलेली नाही.
खरीप पेरण्या ५० टक्क्यांपर्यंत
पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात गती धरली. यामुळे ही सरासरी गाठली आहे. दुसरीकडे खरीप पेरण्या या महिन्यात ५० टक्क्यांपर्यंत पोचलेल्या आहेत. काही भागात याहीपेक्षा अधिक पेरण्या झालेल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.