Kolhapur Neet Students : घरची परिस्थिती बेताची. आई-वडील शेतकरी. अनंत अडचणी असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नाधवडे (ता. भुदरगड) येथील शेतमजूर कुटुंबातील ऋतिका रघुनाथ पाटील हिने पहिल्याच प्रयत्नात ‘नीट’ परीक्षेत ६२३ गुण मिळवत यश संपादन केले. तर हातकणंगले तालुक्यातील वैभव साताप्पा अवघडे याने ७२० पैकी ६६० गुण मिळवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित केला आहे.
ऋतिकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाधवडेत, तर अकरावी-बारावीचे शिक्षण मुदाळ येथील प. बा. पाटील सायन्स ॲकॅडमीमध्ये झाले. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती अविरत कष्ट घेत होती. सोमवारी (ता. ४) ‘नीट’चा निकाल जाहीर झाला. त्यात तिने पहिल्याच प्रयत्नात ६२३ गुण मिळवले.
ऋतिकाचे वडील रघुनाथ पाटील व आई सविता पाटील अल्पशिक्षित आहेत. वडील मुंबईत हॉटेलमध्ये काम करत होते. मात्र, तेथील तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा खर्च भागणे अवघड बनल्याने त्यांनी गावी येऊन शेती तसेच ऊसतोडणीचे काम सुरू केले.
मुलीच्या यशामुळे पाटील कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गरीब शेतकरी कुटुंबातील ऋतिकाने नीट परीक्षेत यश मिळवले; पण पुढच्या शिक्षणासाठी खर्च करणे जिकिरीचे असल्याने तिला गरज आहे ती समाजाच्या आर्थिक पाठबळाची.
अवघडेने अवघड परिक्षा केली सहज पार
वडील आणि आई दोघेही मजुरी आणि शेती करून आपलं घर चालवतात परंतु मुलाने मनाशी जिद्द बाळगत अतिषय चिकाटीने अभ्यास करून घवघवीत यश संपादन केलं आहे. ना बंगला ना गाडी अत्यंत साध्या घरात कशाचाही आधार न घेता पट्टणकोडोली येथील वैभव साताप्पा अवघडे याने ७२० पैकी ६६० गुण मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
त्याचे वडील अत्यल्प भुधारक शेतकरी आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ही त्याने मिळवलेल्या या यशाने त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.