Onion Market : बाजार समिती बाहेरच कांदा व्यापार करावा ः अनिल घनवट

Onion Rate : हमाल मापाड्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट बंद आहे.
Onion Market
Onion MarketOnion Market

Pune News : हमाल मापाड्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट बंद आहे. हमाल मापड्यांची बेकायदेशीर मागणी व दादागिरी मोडून कढण्यासाठी शेतकरी व व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर कांदा व्यापार सुरू करतील असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

‘नो वर्क, नो वेजेस’चा कायदा आहे. त्यानुसार बाजार समित्यांना या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तरी शेतकऱ्यांकडून अशी बेकायदेशीर वसुली सुरूच आहे. शेतकरी संघटनेने याबाबत अनेक वेळा आवाज उठविला आहे, मात्र बाजार समित्या दखल घेत नाहीत.

Onion Market
Onion Market : कांद्याची खेडा खरेदी घसरणीवर

शेतकऱ्यांची ही लूट कायमची बंद न झाल्यास बाजार समिती बाहेरच कांदा विक्री सुरू करावी लागेल असे मत घनवट यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील पणन कायद्यानुसार ५ जून २०१६ सालापासून फळे, फुले व भाजीपाला नियमन मुक्त करण्यात आला आहे. या शेती उत्पादनांची विक्री शेतकरी बाजार समिती बाहेर कुठेही करू शकतात. आपल्या शेतातून, घरातून, एखाद्या संकलन केंद्रावर किंवा रस्त्यावरही विक्री होऊ शकते.

बाजार समितीचे कुठलेही बंधने किंवा नियम त्याला लागू नाहीत. बाजार समितीचा सेस देण्याची गरज नाही. कारण बाजार समितीची कोणतीच सेवा शेतकरी व व्यापारी घेणार नाहीत. व्यापारी व शेतकऱ्यांनी मिळून बाजार समिती बाहेर कांदा संकलन केंद्र सुरू करून तेथे कांदा खरेदी विक्री सुरू करावी.

याला कोणताही कायदेशीर अडथळा नाही, असे केल्यास शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. हमाल मापाड्याच्या जाचातून व दादागिरीतून सुटका होणार आहे. व्यापाऱ्यांना ही सेस द्यावा लागणार नाही म्हणून शेतकऱ्यांच्या कांद्याला दोन रुपये जास्त दर देता येईल.

Onion Market
Onion Market : कांदा लिलाव दहा दिवसांपासून ठप्प

बाजार समितीत निवडून जाणारे संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, परंतु ते शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी व हमाल मापड्यांचेच हित पाहतात हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांची दर वर्षी कोट्यवधी रुपयांची लूट होत असताना हे शांत बसले आहेत. असे बेकायदेशीर प्रकार बंद करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून २०१३ सालीच बाजार समित्यांना दिले आहेत.

असे असताना संचालक मंडळाने दहा वर्षे कारवाई केली नाही. यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी बाजार समितीबाहेर सर्व फळे, फुले व भाजीपाल्यांचा वापर शेतकरी व व्यापाऱ्यांनी सुरू करावा, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com