Jaggery Production : 'शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शास्त्रीय गूळनिर्मिती तंत्रज्ञान अवगत करावं'

Farmers Jaggery Production : कृषी विज्ञान केंद्र, (बोरगाव ता. जि. सातारा) डॉ. कल्याण बाबर यांनी शास्त्रीय गूळनिर्मितीसंदर्भात माहिती दिली.
Jaggery Production
Jaggery Productionagrowon

Traditional Jaggery Production : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने शिफारस केलेल्या शास्त्रीय गूळनिर्मिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावे, असे प्रतिपादन सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र डॉ. अशोककुमार पिसाळ यांनी केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव (जि. सातारा) आणि अखिल भारतीय समन्वयीत काढणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रकल्प, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरमध्ये तीन दिवसीय शास्त्रोक्त पद्धतीने गूळनिर्मिती प्रशिक्षणाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. लुधियानातून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. के. विश्वकर्मा यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

डॉ. विश्वकर्मा यांनी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले. तंत्रज्ञानाने बनवलेल्या काकवीस बाजारपेठ देण्याबाबत आश्र्वस्त केले. नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक आशुतोष जाधव उपस्थित होते. प्रथम दिवसाच्या तांत्रिक सत्रात महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी गुळाची मानांकन पणन व्यवस्था आणि निर्यातीसंदर्भात मार्गदर्शन केले.

गूळ प्रक्रियेतील विविध निविष्ठांची ओळख आणि वापर याची माहिती कृषी विद्यावेत्ता डॉ. विद्यासागर गेडाम दिली. कर्जपुरवठा व प्रकल्प अहवालासंबंधित माहिती प्रमुख जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक प्रमुख जिल्हा व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी दिली. दुसऱ्या दिवसाच्या तांत्रिक सत्रात ऊस पिकाची ओळख, वाढीची अवस्था आणि सुधारित वाणांची माहिती डॉ. योगेश बन यांनी दिली.

Jaggery Production
Jaggery Market : कऱ्हाड बाजार समितीत गुळाला उच्चांकी दर

कृषी विज्ञान केंद्र, (बोरगाव ता. जि. सातारा) डॉ. कल्याण बाबर यांनी शास्त्रीय गूळनिर्मितीसंदर्भात माहिती दिली. दुपारच्या सत्रात गूळ निर्मितीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांची ओळख व निगा, गुळाचे रासायनिक पृत्थकरण, गूळ, काकवी, पावडर आणि मूल्यवर्धित उत्पादने निर्मितीचे प्रात्यक्षिक डॉ. गोविंद येनग यांनी दाखवले. तिसऱ्या दिवशीच्या तांत्रिक सत्रामध्ये भारतीय अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार पॅकेजिंग नियमावलीबाबत डॉ. सिद्धार्थ लोखंडे यांनी माहिती दिली.

अन्नप्रक्रिया उद्योग उभारणी आणि प्रकल्प अहवालाबाबत मार्गदर्शन डॉ. अभिजित गाताडे यांनी केले. प्रदीप पावडे यांनी अन्नसुरक्षा मानके कायदा आणि तरतुदींबाबत चर्चा केली. गूळ पॅकेजिंग प्रकार व आवश्यक यंत्राबाबत वसंत सुतार यांनी चर्चा केली. अन्नप्रक्रिया उद्योगातील स्वच्छता मानके व डिजिटल मार्केटिंगबाबत

डॉ. कल्याण बाबर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कल्याण बाबर यांनी नियोजन केले. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहाय्य मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com