Soybean Seed : सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड

Seed Subsidy : येथील कृषी विभागातर्फे अनुदानावर देण्यात येत असलेल्या सोयाबीन बियाणे घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी कार्यालयात झुंबड उडत आहे.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon

Kolhapur News : येथील कृषी विभागातर्फे अनुदानावर देण्यात येत असलेल्या सोयाबीन बियाणे घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी कार्यालयात झुंबड उडत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र १२ हजार ५०० हेक्टरवर आहे.

दरम्यान, या वर्षी मोफत बियाणे उपलब्ध झालेले नाहीत. परंतु ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर सोयाबीन वाटप सुरू झाले आहे. तालुक्यासाठी ४५० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाली आहेत. त्यात सर्वसाधारण गटासाठी २३४ क्विंटल, अनुसूचित जातीसाठी १३९.५० क्विंटल, अनुसूचित जमातीसाठी ७६.५० क्विंटल बियाण्‍यांचे वाटप होणार आहे.

Soybean Seeds
Bogus Seed : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी सीमावर्ती भागात तपासणी

बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्याने एक एकराचे प्रात्यक्षिक घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० किलो बियाणे वाटप केले जाणार आहे. बियाण्यांचा दर ८० रुपये किलो असून, त्याला २० रुपयांचे अनुदान आहे.

हे बियाणे नेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी कार्यालयात रीघ लागली आहे. कार्यालयात पावती करायची आणि मार्केट यार्डमधील गोडाउनमध्ये बियाणे दिली जात आहेत. पावती करण्यासाठी कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.

Soybean Seeds
Bogus Seed : काटोल, नरखेडमध्ये बोगस बियाण्यांचे जाळे

अनुदान नको, मोफत द्या

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांना निवेदन देत अनुदानावरील सोयाबीनऐवजी मोफत द्या, अशी मागणी केली आहे. कृषी सेवा केंद्रावर जादा दराने बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

दरवर्षी बियाणे मोफत दिली जातात. या वर्षीही मोफत सोयाबीन बियाणे देणे आवश्यक आहे. अनुदानावर सुरू असलेले वाटप बंद करून वेळेत मोफत बियाणे देण्याची मागणी आहे. राजू रेडेकर, दिलीप माने, अजित खोत, अवधूत पाटील, युवराज पोवार, काशिनाथ गडकरी, संजय पाटील, स्नेहल पाटील सुरेश हेब्बाळे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com