Farmer Issue : मदर डेअरी विरोधात शेतकऱ्यांचा रोष

Mother Dairy Company : दर डेअरीच्या संकलन केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून तिवसा शहरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध घेण्यास नकार देण्यात येत आहे.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Amravati News : मदर डेअरीच्या संकलन केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून तिवसा शहरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध घेण्यास नकार देण्यात येत आहे. या विरोधात बुधवारी सातरगाव मार्गावर शेतकऱ्यांनी डेअरीच्या वाहनातील दूध फेकून कंपनीविरोधात रोष व्यक्त केला.

मदर डेअरीकडून जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून एका सहाय्यकामार्फत दूध संकलन करण्यात येते. दूध संकलन करून त्यावर चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला येथील केंद्रात प्रक्रिया केली जाते. यात तिवसा तालुक्यातील १३ गावांतून एकाच वेळी शेकडो लिटर दूध एका वाहनाद्वारे संकलन करण्यात येत होते.

Farmer Issue
Milk Price : संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्ग दूध दरवाढीसाठी अडविला

मात्र गेल्या पाच दिवसांपासून येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध घेण्यास या कंपनीने नकार दिला जात असल्याचा आरोप तिवसा शहरातील दूध उत्पादकांनी केला आहे. मदर डेअरी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सूचना न देता अचानक दूध घेणे बंद केल्यामुळे येथील दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. दूध संकलन सुरू करून दुधाच्या फॅटप्रमाणे पैसे देण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती.

Farmer Issue
Gokul Milk Subsidy : दूधसंस्थांच्या इमारत बांधकामास 'गोकुळ'कडून मिळणार अनुदान
तिवसा येथील मदर दूध डेअरीला आम्ही नियमित दूध देतो. परंतु गेल्या पाच दिवसांपासून मशिन बंद असल्याचे कारण देत दूध घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आज आम्ही सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मार्गावर दूध फेकून या कंपनीचा निषेध केला. शासनाकडून दुधावर पाच रुपयाचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत अनुदान मिळाले नाही.
संजय घुरडे, दूध उत्पादक शेतकरी
आम्ही तिवसा येथे एका सहाय्यकाची नेमणूक करून दूध घेत होतो. परंतु काही दिवसांपासून येथील सहाय्यक कंपनीचे नियम डावलून दुधाची विक्री करत असल्याचे निर्दर्शनात आले. तसेच येथील मशिन नादुरुस्त असल्यामुळे आम्ही दूध घेणे बंद केले होते. आज याठिकाणी काही शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून वाहन पाठविले होते. मात्र त्यातील दूध शेतकऱ्यांनी फेकून दिले. लवकरच आम्ही याठिकाणी नवीन सहाय्यकाची नेमणूक करून दूध संकलन करू.
आशिष जाधव, एरिया ऑफिसर, मदर डेअरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com