Team Agrowon
पंजाब हरियाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर दोन हजारांहून ट्रॅक्टर आणि ट्रॉली असून सोमवारी सकाळी ११ वाजता शेतकरी दिल्लीच्या दिशेनं कूच करणार आहेत.
तसेच लोखंडी बॅरीकेडसमधून मार्ग काढण्यासाठी हायड्रा बोअर आणि जेसीबीची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना २३ पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी द्यावी, कर्जमाफी करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,
शेतकरी आणि शेत मजुरांना पेन्शन लागू करावी, वीज दरात वाढ करू नये, २०२१ मधील लखीमपुर खेरी हिंसाचारातील पीडितांवरील पोलिस खटले मागे घ्यावेत आदि मागण्या आहेत.
यातील हमीभाव कायदा, कर्जमाफी स्वामीनाथन आयोगाच्या मागण्यांवर आंदोलक शेतकरी नेते आडून आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी दिल्ली चलोचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी सीमाभागात पुन्हा तणाव वाढला आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत शेतकरी आंदोलनाच्या समस्येवर चर्चा करण्यात आल्याची माहिती एक्सवरून सिंग यांनी दिली.