Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Sesame Sowing : यंदा उन्हाळी तिळाखालील क्षेत्र १५ हजार हेक्‍टरवर पोहोचल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी दिली.
Sesame Sowing
Sesame Sowing Agrowon

Yavatmal News : मॉन्सूनोत्तर, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच नैसर्गिक वातावरण शेंगा धरण्यास पोषक नसल्याने हुकमी पीक असलेल्या भुईमुगाचा नाद सोडत शेतकऱ्यांनी तेलबियावर्गीय तिळाच्या लागवडीवर भर दिला आहे. त्याच्याच परिणामी गेल्या दोन वर्षांत तीळ लागवड क्षेत्रात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.

यंदा उन्हाळी तिळाखालील क्षेत्र १५ हजार हेक्‍टरवर पोहोचल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी दिली. आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख. याच जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी मोठ्या क्षेत्रावर खरीप ज्वारीची लागवड होती. त्यातून जनावरांकरिता चारा आणि धान्याची उपलब्धता होत असल्याने हे पीक फायदेशीर ठरत होते.

Sesame Sowing
Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

त्यापुढील काळात जंगली जनावरांचा त्रास वाढल्यामुळे हे पीक नामशेष झाले. आता मात्र चांगल्या दराच्या परिणामी उन्हाळी ज्वारीखाली १५ हजार हेक्‍टर क्षेत्र पोहोचले आहे. रब्बी हंगामात देखील ५ ते ६ हजारांवर रब्बी ज्वारी घेण्यावर भर होता. त्यासोबतच उन्हाळी भुईमूग शेतकरी घेत होते. दारव्हा, दिग्रस, पुसद तालुक्‍यांत भुईमुगाला शेतकऱ्यांची पसंती होती.

Sesame Sowing
Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

परंतु दोन वर्षांपासून वातावरणातील बदलाचा फटका बसत पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शेंगधारणा होत नसल्याने हे पीक शेतकऱ्यांनी सोडले. त्याऐवजी तीळ लागवडीवर भर दिला जात असल्याने उन्हाळी तिळाखालील क्षेत्र वाढून १४ ते १५ हजार हेक्‍टरवर पोहोचल्याची माहितीदेखील प्रमोद लहाळे यांनी दिली.

४-५ हजार हेक्‍टर उन्हाळी मूग देखील लावण्यात आला आहे. पारंपरिक पिकांना अपेक्षित दर मिळत नसल्याच्या परिणामी शेतकऱ्यांनी पर्यायी आणि व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे, असेही प्रमोद लहाळे म्हणाले.

भुईमुगाला शेंगधारणा होत नसल्याने त्याऐवजी तिळाच्या लागवडीत गेल्या दोन वर्षांपासून सातत्य राखले आहे. तिळाला सरासरी १५ ते १७ हजार रुपयांचा दर मिळतो. हमखास बाजारपेठ असल्याने हे पीक फायदेशीर ठरते, असा अनुभव आहे. या पिकाच्या उत्पादकतेत तंत्रशुद्ध व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक ठरतो.
- ओंकार काळमेघ, शेतकरी, गाजीपूर, दारव्हा, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com