Dragon Fruit Production : ‘ड्रॅगन फ्रूट’ उत्पादकतावाढीसाठी कृत्रिम परागीभवन

Dragon Fruit Cultivation : ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये अधिक उत्पादनासाठी कृत्रिम परागीभवन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो.पुंकेसर काढणे आणि परागीकरण एकाच वेळी केले जाऊ शकते.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon
Published on
Updated on

डॉ. के.एम.बोरय्या

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये अधिक उत्पादनासाठी कृत्रिम परागीभवन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो.पुंकेसर काढणे आणि परागीकरण एकाच वेळी केले जाऊ शकते. परंतु फळांचा आकार आणि वजन वाढविण्यासाठी सर्वोत्कृष्ट परागकण स्रोत ओळखणे फार महत्त्वाचे आहे.

देशातील सर्व ‘ड्रॅगन फ्रूट' उत्पादकांनी कृत्रिम परागीभवन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पावसाळ्यात, पांढऱ्या रंगाच्या जातीसाठी उत्पादकांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. जेणेकरून पावसामुळे वाया जाणारे परागकण आणि त्यामुळे होणारे संभावित नुकसान टळू शकते. ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये अधिक उत्पादनासाठी या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो.

सध्या, ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीमध्ये कृत्रिम परागीकरणाचा अवलंब केला जात नाही. तथापि, काही शेतकरी पारंपारिक पद्धतींचा वापर करून, परागकण गोळा करतात. ब्रशच्या साहाय्याने हाताने परागीभवन करतात. ही पद्धत वेळखाऊ आणि श्रम-केंद्रित आहे.

Dragon Fruit
Dragon Fruit Farming : दर्जेदार ड्रॅगन फ्रूट उत्पादनासाठी शेडनेटचा वापर

सुधारित तंत्रज्ञान

पावसामुळे उत्पन्नात होणारी घट टाळण्यासाठी आणि फळांचे आकारमान व वजन वाढवण्यासाठी, स्व आणि पर-परगीकरणाच्या (कोणत्याही किटकाशिवाय) साध्या आणि सोप्या पद्धती विकसित केल्या आहेत.

अ) स्व-परागीकरण

एकाच झाडाच्या किंवा त्याच जातीच्या इतर वनस्पतींतील एकाच किंवा वेगळ्या फुलातील परागकणांचा वापरून, फुलांच्या स्त्रीकेसरांचे परागीकरण, हे खाली वर्णन केल्याप्रमाणे पुंकेसर काढून किंवा त्याशिवाय केले जाऊ शकते.

पुंकेसर काढून

फूल उमलण्याच्या दिवशी, परागकण बाहेर आल्याची खात्री झाल्यानंतर (संध्याकाळी ४ नंतर), फुलांचे पुंकेसर काढावेत. जमा केलेल्या परागकणांचा वापर करून परागीकरण करावे (त्याच फुलाच्या परागकणांची धूळ स्त्रीकेसरवर झाडावी). एका फुलाचे परागकण सुमारे ८ ते १० फुलांचे परागीकरण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

पुंकेसर न काढता

फूल उमलण्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी, त्याच फुलाचे किंवा दुसऱ्या विलग केलेल्या फुलाचे परागकण वापरून हलक्या हाताने परागीकरण करता येते.

Dragon Fruit
Dragon Fruit and Avocado Subsidy : एकात्मिक’मधून मिळणार ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडोला अनुदान

ब) पर-परागीकरण

दुसऱ्या जातीच्या फुलांचे परागकण (नर) वापरून फुलांचे स्त्रीकेसराचे (मादी) परागीकरण करणे. उदाहरणार्थ, लाल रगाच्या जातीच्या फळांचे परागकणांसह पांढऱ्या प्रकारच्या फुलांचे स्त्रीकेसरांचे परागीकरण करणे. फूल उमलण्याच्याआधी किंवा दुपारच्याआधी मादी फुलांचे संवर्धन करावे आणि ताज्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संचित परागकण वापरून फुलांचे परागीकरण करावे.

तथापि, पुंकेसर काढणे आणि परागीकरण एकाच वेळी केले जाऊ शकते. परंतु फळांचा आकार आणि वजन वाढविण्यासाठी सर्वोत्कृष्ट परागकण स्रोत ओळखणे फार महत्त्वाचे आहे.

तंत्रज्ञानाची कार्यक्षमता

नैसर्गिक परगीकरणाच्या तुलनेने, स्व पूरक आणि पर-परागीकरणाने फळांचा आकार अनुक्रमे ४० टक्के आणि १०० टक्यांपर्यंत वाढतो. चमकदार रंगाच्या फळांसह ६० ते ७० टक्के उच्च प्रतीच्या (३५० ते ४५० ग्रॅम) फळांची गुणवत्ता वाढते.

प्रभाव आणि प्रसार

हे तंत्रज्ञान शंभरहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणाद्वारे दाखविण्यात आले आहे. आणि कृषी विज्ञान केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रचार करणे आवश्यक आहे.

डॉ. के.एम.बोरय्या, ७०९०९१११०४, ( राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती,जि.पुणे )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com