Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Insurance : जळगाव जामोद तालुक्यात पीकविम्याच्या मुद्द्यावर शेतकरी आक्रमक

Jalgaon Jamod Farmers protested : २२ जुलै २०२३ ला निसर्गाच्या लहरीपणामुळे ढगफुटी झाली होती. त्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची शेती पिकांसह खरडून गेल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता.
Published on

Buldana News : जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत सोयाबीन-कापसाचा गेल्या हंगामातील पीकविमा मिळावा यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. त्यांच्या दालनामध्ये ठिय्या दिला.

सन २०२३ या वर्षात जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन-कापसाचा पीकविमा काढला होता. त्या वेळी अचानक २२ जुलै २०२३ ला निसर्गाच्या लहरीपणामुळे ढगफुटी झाली होती. त्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची शेती पिकांसह खरडून गेल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता अशा शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई मिळणे गरजेचे असतानाही कंपनीने अल्पशा शेतकऱ्यांना २५ अग्रिम मदत देऊन मोकळी झाली. अनेक शेतकऱ्यांना अपात्र केले.

Crop Insurance
Advance Crop Insurance : शेतकऱ्यांना नुकसानीचा अग्रिम पीकविमा १५ दिवसांत मिळावा : धंनजय मुंडे

त्यामुळे नुकसान होऊन सुद्धा जर विमा कंपनी वेगवेगळे निकष लावून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १०) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या वेळी पीकविमा कंपनीचे तालुकास्तरीय प्रतिनिधी व कृषी अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांनी संवाद साधला. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना सुरुवातीला १५ ऑगस्टला पीकविमा मिळेल, त्यानंतर ३१ ऑगस्टला मिळेल, अशा तारखा दिल्या.

मात्र, अद्यापही मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. जर, पिकाचे नुकसान होऊनसुद्धा विमा कंपनी नुकसान भरपाई देणार नसेल तर शेतकरी भविष्यात आक्रमक होतील, असा इशारा या आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com