Agriculture Technology : शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरूक राहण्याची गरज

Scientist Dr. S. D. Ramteke : शेतीत पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन सुधारित पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे नवनवीन कृषी तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Nashik News : शेतीत पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन सुधारित पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे नवनवीन कृषी तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे. त्यातून आपली प्रगती साधता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके यांनी केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके आणि डॉ. पी. एच. निकुंभे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रास (केव्हीके) भेट दिली. या भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. कार्यक्रमांविषयी सविस्तर आढावा या भेटीदरम्यान घेण्यात आला. या वेळी शास्त्रज्ञांनी नाशिक परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. केव्हीकेमार्फत केल्या जाणाऱ्या कामाविषयी जाणून घेतानाच त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

Agriculture Technology
Agriculture Technology : युवकाने विकसित केले रोपे लागवड, बी टोकण यंत्र

डॉ. रामटेके म्हणाले, की शेतकऱ्यांनी कृषी विषयक नवनवीन तंत्रज्ञानाविषयी नेहमीच जागरूक राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी गटांच्या माध्यमातून शेतीमालाची विक्री तसेच प्रक्रिया करावी जेणेकरून शेतीमालाला चांगला चांगला भाव मिळेल, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत अधिकाधिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचावे यासाठी बारकाईने लक्ष देऊन शेतकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे, त्याबद्दल डॉ. रामटेके यांनी कुलगुरू प्रा. सोनवणे यांचे आभार मानले.

Agriculture Technology
Agriculture Cultivation Technology : हुरडा ज्वारी वाण अन् लागवड तंत्रज्ञान

केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना अभ्यासता यावे यासाठी विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक युनिट्स उभारण्यात आले आहेत. प्रामुख्याने आधुनिक पद्धतीने १५ विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, अत्याधुनिक फळरोपवाटिका, गांडूळ खत उत्पादन, मशरूम उत्पादन, जैविक खते व जैविक कीटकनाशके निर्मिती प्रयोगशाळा, माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा, सूक्ष्म अन्नद्रव्ये उत्पादन प्रयोगशाळा, सूक्ष्मसिंचन यंत्रणा या प्रात्यक्षिक युनिट्सला भेट दिली. विशेषतः सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण जैविक निविष्ठा पुरवठा यासाठी केव्हीके करीत असलेल्या कामाबद्दल त्यांनी केंद्राचे कौतुक केले.

याप्रसंगी केव्हीकेचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, विषय विशेषज्ञ राजाराम पाटील, हेमराज राजूपत, डॉ. प्रकाश कदम, संदीप भागवत, अर्चना मोहोड, डॉ. शाम पाटील, मंगेश व्यवहारे, हर्षल काळे तसेच शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com