Delhi Farmer March : शंभू सीमेवरून शेतकऱ्यांचा २१ रोजी दिल्लीला मोर्चा

Shambhu Border to Delhi March : हरियाना-पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २१ जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामध्ये १०१ शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले.
Sarvan Pandher
Sarvan PandherAgrowon
Published on
Updated on

Chandigarh News : हरियाना-पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २१ जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामध्ये १०१ शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले. केंद्र सरकार अद्याप चर्चेसाठी तयार नाही, त्यामुळे आम्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचेही ते म्हणाले.

Sarvan Pandher
Farmer Protest : संयुक्त किसान मोर्चाने नाकारला ‘एनपीएफएएम’चा मसुदा!

एसकेएम (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली शेतकरी गेल्या वर्षी १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियानामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत. डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी तीनवेळा दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ६ डिसेंबर, ८ डिसेंबर आणि १४ डिसेंबर २०२४ रोजी शेतकरी दिल्लीला रवाना झाले होते, परंतु तीनही वेळा हरियाना पोलिसांनी त्यांना बॅरिकेडवर रोखले.

Sarvan Pandher
51st Day Of Protest : डल्लेवाल यांच्या उपोषणाचा ५१ वा दिवस; १११ शेतकऱ्यांचा जथ्था काळे कपडे घालून बसणार उपोषणाला

शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी एमएसपी हमी कायद्याबाबत ११ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित डल्लेवाल ५२ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या समर्थनार्थ १११ शेतकरी सलग दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी डल्लेवाल यांच्या बिघडत चाललेल्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

पंढेर म्हणाले, की २०२२ च्या घटनेत आता पंजाब सरकारने केंद्राच्या दबावाखाली सुमारे २५ शेतकऱ्यांवर समन्स पाठवले आहेत. त्यात आता खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणाचीही भर पडली आहे. आमचा विरोध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com