Farmers Protest : शंभू बॉर्डरवर स्थानिक आणि शेतकरी यांच्यात वाद; पंढेर यांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल

Farmers Leader Sarwan Singh Pandher : गेल्या चार महिन्यापासून हरियाणा राज्याच्या शंभू बॉर्डरवर हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहे. यादरम्यान शंभू बॉर्डरवर स्थानिक आणि शेतकरी यांच्यात वाद झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंजाब आणि हरियाणाच्या सीमांवर गेल्या चार महिन्यापासून शेतकरी आंदोलनास बसले आहेत. तर त्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्यासाठी शंभू सीमा बंद करण्यात आली आहे. या सीमेवरूनच आता तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप होत असून शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पंढेर यांनी, शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर वाळू माफिया आणि गुंडांनी भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तसेच पंजाबमधील आम आदमी पार्टीचे सरकारही भाजपसोबत असून शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, असाही इशारा पंढेर यांनी दिला आहे. सध्या पंढेर यांचा याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे.

हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी गेल्या चार महिन्यापासून हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहे. त्यामुळे शंभू बॉर्डर बंद आहे. याचा फटका सीमेवरील काही गावांना बसत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी शंभू सीमा खुली करण्याची मागणी करत आंदोलन केले. यावेळी आधीच आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र शंभू सीमेवर आधी आंदोलन करणारे शेतकरी आणि आता सीमा खुली करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाली. यावरून पंढेर यांनी, शेतकऱ्यांवर हा हल्ला भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप केला आहे.

Farmers Protest
Delhi Farmers Protest : हमीभाव कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; संयुक्त किसान मोर्चाचा एल्गार

पंढेर यांनी म्हटले आहे की, आम्ही १३ फेब्रुवारीपासून दोन आघाड्यांवर आंदोलन करत आहोत. केंद्र सरकारने रस्ते बंद केले आहेत. आम्ही नाही. सरकारला रस्ते खुले करावेत असे आवाहन आम्ही केले आहे. मात्र भाजप सरकारने भिंत बांधली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांचे हाल होत आहेत. भाजपचे बडे नेते २ जूननंतर भेटू, असे सांगत राहिले आणि आता त्यांनी शेतकऱ्यांना आमच्या अंगावर सोडले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या नावाखाली भाजपचे गुंड आणि वाळू माफियांनी रविवारी शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रविवारी शेतकरी आंदोलनस्थळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच स्टेजवर चढून धुडगूस घातला. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना मागे ढकलले असे पंढेर यांनी म्हटले आहे.

पंजाब सरकारही भाजपसारखेच

शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलकांवर रविवारी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तो अयशस्वी झाला. भाजपचा डाव आता उघडकीस आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्र्यांची बुद्धिमत्ताही ही भाजपच्या हल्लेखोरांसारखी झाली आहे. या सरकारला येथे मृतदेह पडताना पाहायचे असून यासाठीच पंजाबचे मुख्यमंत्री गप्प बसले आहेत. तर पंजाब पोलीस देखील आता त्यांना सहकार्य देत आहे. ते आमची सुरक्षा करू शकत नाहीत, असा हल्लाबोल पंढेर यांनी केला आहे.

Farmers Protest
MSP Farmers Protest : पंतप्रधान मोदी, शिवराजसिंह हमीभावाची गॅरंटी देणार का ? आंदोलनाचे १२० दिवस; विरोधकांचा शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा

पंढेर यांचे शेतकऱ्यांना आव्हान

आंदोलनाला संरक्षण देणे हे पंजाब सरकारचे कर्तव्य असतानाही असे हल्ले होत आहेत. त्यामुळे अशा हल्ल्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. त्यामुळे पंजाबच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांसह शेत मजुरांनी शंभू सीमेकडे पोहचावे, असे आवाहन पंढेर यांनी केले आहे. तर स्थानिक जनता पूर्णपणे आमच्या पाठीशी उभी आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातील जनताही भाजपच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतील असेही पंढेर यांनी म्हटले आहे.

समाजकंटक नाही ग्रामस्थ

रविवारी शेतकरी आंदोलनस्थळी काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच स्टेजवर चढून धुडगूस घातला. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना मागे ढकलले असे पंढेर यांनी म्हटले आहे. त्यावरून आंदोलक ग्रामस्थानी आंदोलनस्थळी गेलेले समाजकंटक नव्हे तर ग्रामस्थ गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच अनेक महिन्यांपासून बंद असलेली शंभू सीमा उघडण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक गेले होते, असेही आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थानी म्हटले आहे.

तसेच याआधी देखील शंभू सीमेवरून दुचाकी नेण्याबाबत मागणी केली होती. मात्र शेतकरी नेत्यांनी आजपर्यंत त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच रविवारी आंदोलनास्थळी आजूबाजूच्या गावातील लोक पोहोचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच शंभू सीमा बंदबरोबरच शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामस्थांने मोठे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच शंभू सीमा खुली न केल्यास येत्या काही दिवसांत शंभू सीमेची चारही बाजूंनी नाकेबंदी करू, असा इशारा आंदोलन ग्रामस्थांनी दिला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com