Shetkari Sahitya Sammelan : शेतकरी प्रश्‍न मांडण्याचे साहित्य संमेलन व्यासपीठ

Farmer Literature : साहित्य संमेलन शेतकऱ्यांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या आणि व्यथा मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. या ठिकाणी मांडलेले प्रश्‍न शासनापर्यंत पोहोचवून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन, नांगरट साहित्य साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कवी, साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.
Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : साहित्य संमेलन शेतकऱ्यांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या आणि व्यथा मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. या ठिकाणी मांडलेले प्रश्‍न शासनापर्यंत पोहोचवून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन, नांगरट साहित्य साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कवी, साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (ता. १६) दुसरे नांगरट साहित्य संमेलन जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे जयसिंगपूर कॉलेजच्या प्रांगणात युगात्मा शरद जोशी साहित्य नगरीत, संत चोखामेळा विचारपीठावर पार पडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी स्वागताध्यक्ष होते.

या वेळी श्री. भालेराव बोलत होते. संघटनेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शंकर धोंडगे पाटील व पत्रकारितेमधील जीवन गौरव पुरस्कार ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan :शेतकऱ्यांच्या आयुष्यात साहित्याचा ठेवा महत्त्वाचा

स्वागताध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, की मराठी साहित्यात शेतकऱ्यांच्या व्यथा अभावानेच मांडल्या गेल्या. शेतकऱ्यांचे वास्तव जीवन चित्र समाजासमोर आणण्याचे काम साहित्यिकांचे आहे. शोषण होणारा शेतकरी आणि त्याच्या व्यथा साहित्यात परखडपणे मांडता आल्या पाहिजेत.

डॉ. महावीर अक्कोळे यांनी स्वागतपर मनोगतात साहित्य संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. सेवानिवृत्त जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, की प्रशासकीय सेवेत असताना दुष्काळी भागातील लोकांच्या समस्या जवळून पाहता आल्या. त्यांच्यासाठी कार्य करत आले याचे समाधान वाटते. ५४ टक्के लोक शेती व्यवसायाशी निगडित आहेत. वर्षानुवर्षे समस्या पाठीशी बांधून शेतकरी शेती करत असताना राज्यकर्ते मात्र ढिम्म आहेत.

श्री. धोंडगे पाटील म्हणाले, की शेतीसाठी दीडशे अवजारे, वस्तू वापरावे लागतात. आंदोलनाशिवाय हक्क मिळत नाहीत. वर्षानुवर्षे आंदोलन होतात मात्र बळीराजाला हक्क मिळत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे आता शेतकरी चळवळीने बुडापासून नांगरट करण्याची गरज आहे. श्री. भोसले म्हणाले, की शेतकऱ्याच्या परिस्थितीवर परिणामकारक चित्रण करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. साहित्य

Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan : सरकारची शेतीविरोधी धोरणे अधोगतीस कारणीभूत

शेतकऱ्यांच्या खऱ्या वेदनांचे वास्तव चित्रण करणारे हवे. वायएसपी इंडियाचे को-डायरेक्टर शिवम मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रभाकर माने यांच्या कृषी अर्थकारण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी विजय कृषी सेवा केंद्राचे विजय देसाई, ऑल इंडिया रेडिओचे निवृत्त स्टेशन डायरेक्टर श्रीपाद कहाळेकर, डॉ. सुभाष अडदंडे, सुभाष शेट्टी, नीलम माणगावे, डॉ. चिदानंद आवळेकर, जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एम. मांजरे, डॉ. मोहन पाटील, शैलेश चौगुले, सौरभ शेट्टी, अभय भिलवडे यांच्यासह साहित्यिक, शेतकरी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. किरण पाटील व सौ. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संदीप तपकिरे यांनी आभार मानले.

शेती अवजारांची काढली दिंडी

सकाळी आठ वाजता शेती अवजारे दिंडी काढण्यात आली. ग्रामदेवत श्री सिद्धेश्‍वर मंदिरापासून दिंडी संमेलनस्थळी आणण्यात आली. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, बिझनेस स्टॅंडर्डचे ज्येष्ठ पत्रकार राधेशाम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘चंगळवादी व्यवस्थेत शेतकरी बेदखल’ या विषयावर परिसंवाद झाला. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शेषराव मोहिते अध्यक्षस्थानी होते. सायंकाळच्या सत्रात प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्यासह राज्यभरातील निमंत्रित कवींचे कवी संमेलन झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com