
Pune News: राज्यातील शेतकऱ्यांना खरिप २०२४ मधील पीकविम्याचे वाटप सुरु आहे. विदर्भातील ९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ४८९ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मंजूर झालेली आहे. तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत २ हजार ३०८ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे. विदर्भातील ९ जिल्ह्यांसाठी एकूण भरपाई ४८९ कोटी ६१ लाख रुपये मंजूर झाली आहे. तर चंद्रपूर आणि गोंदीया जिल्ह्यात भरपाई निश्चित झालेली नाही.
बुलडाणा
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - १४४ कोटी २१ लाख
पीक कापणी प्रयोग - २ लाख
एकूण भरपाई - १४४ कोटी २३ लाख
अमरावती
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ५० कोटी ९ लाख
काढणी पश्चात भरपाई - १० कोटी ५१ लाख
पीक कापणी प्रयोग - १९ लाख
एकूण भरपाई - ६० कोटी ८० लाख
अकोला
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ६६ कोटी ६४ लाख
वाशीम
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - १० कोटी ७४ लाख
यवतमाळ
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ६ कोटी ८६ लाख
काढणी पश्चात भरपाई - २२ कोटी ९५ लाख
एकूण भरपाई - २९ कोटी ८१ लाख
वर्धा
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ११५ कोटी १८ लाख
काढणी पश्चात भरपाई - ७१ लाख
एकूण भरपाई - ११५ कोटी ९० लाख
नागपूर
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ५५ कोटी ९४ लाख
पीक कापणी प्रयोग - ११ लाख
एकूण भरपाई - ५६ कोटी ०५ लाख
भंडारा
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ४ लाख
गडचिरोली
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - २ कोची ९८ लाख
काढणी पश्चात भरपाई - २ कोटी ४० लाख
एकूण भरपाई - ५ कोटी ३८ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.