Thailand Sugarcane : थायलंडमधील शेतकऱ्यांना उसाऐवजी कसावा कंदातून मिळतोय चांगला परतावा

Sugarcane Update : थायलंडमध्ये चालू हंगामात शेतकऱ्यांना उसासाठी चांगला भाव मिळाला. पण उत्पादकतेला फटका बसला होता.
Sugarcane
Sugarcane Agrowon

Sugarcane FRP : थायलंडमध्ये चालू हंगामात शेतकऱ्यांना उसासाठी चांगला भाव मिळाला. पण उत्पादकतेला फटका बसला होता. परिणामी शेतकऱ्यांना उसाच्या तुलनेत इतर पिकांतून चांगले उत्पन्न मिळाले. त्यातच यंदा एल निनोमुळे कमी पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे यंदा थायलंडमधील ऊस उत्पादन ७४० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज येथील काही संस्थांनी व्यक्त केला.

जागतिक ऊस आणि साखर उत्पादनात थायलंडचे स्थान महत्वाचे आहे. मागील हंगामापासून थायलंडमधील ऊस उत्पादनात चांगली वाढ झाली होती. पण पुढील हंगामात म्हणजेच २०२३-२४ च्या हंगामात येथील ऊस पिकाला कमी पावसाचा फटका बसणार आहे.

एल निनोचा परिणाम येथील पावसावर होणार आहे. त्यामुळे शेतकरी उसाला यंदा कमी पसंती देत आहेत. परिणामी पुढील हंगामात थायलंडमध्ये ऊस उत्पादन कमी राहून साखर उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे.

Sugarcane
Sugarcane Production : उसाचे क्षेत्र, उत्पादनात होणार घट

ऊस लागवड कमी होण्याला आणखी एक महत्वाचे कारण असेल. ते म्हणजे इतर पिकांमधून मिळाणारा चांगला परतावा. चालू हंगामात उसाला चांगला भाव मिळाला. पण उसाची उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांना पीक तेवढे फायदेशीर ठरले नाही.

मात्र कसावा सारखे पीक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देऊन गेले. कसावा कंदाच्या किमती ९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कसावा कंदाला चिप्स आणि स्टार्च उद्योगाकडून चांगली मागणी आली होती. कसावाचा मुख्य खरेदीदार चीन ठरला होता. चीनमध्ये कसावाचा वापर इथेनाॅल आणि पशुखाद्यासाठी होतो.

पुढील हंगामातही कसावा कंदाचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे. परिणामी यंदाही कसावातून मिळाणारा परतावा उसापेक्षा जास्त असू शकतो. यामुळेच शेतकरी उसाऐवजी कसावा कंदाला पसंती देण्याची शक्यता आहे.

कसावा कंदाला पसंती मिळत असल्याने उसाची लागवड ५ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. तसेच लागवड झालेल्या उसाला कमी पावसाचाही फटका बसत आहे.

थायलंडमध्ये चालू हंगामात ९४० लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. तर पुढील हंगामात ७४० लाख टनांवर उत्पादन स्थिरावण्याचा अंदाज आहे. म्हणजेच पुढील हंगामातील उत्पादन २००९-१० नंतर दुसऱ्यांदा या पातळीवर पोचणार आहे.

ऊस उत्पादनात घट होणार असल्याने साखर उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा पुरवठा कमी होऊन दरात सुधराणा दिसू शकते. या स्थितीत भारताला साखर निर्यातीची चांगली संधी असेल, असा जाणकारांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com