Sugarcane Production : उसाचे क्षेत्र, उत्पादनात होणार घट

Sugarcane Season : ऊस लागवड क्षेत्रात यंदा ३.६८ लाख हेक्टरने घट होऊन उत्पादनात २७१.१ लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : ऊस लागवड क्षेत्रात यंदा ३.६८ लाख हेक्टरने घट होऊन उत्पादनात २७१.१ लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. क्षेत्र आणि उत्पादकतेत ६.३ टक्क्यांनी वाढ होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय गळीतधान्यांच्या क्षेत्रात २७.३, तूर, मूग आणि उडदाच्या क्षेत्रामध्येही १९.९ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. कापसाच्या क्षेत्रातही १.४ टक्क्याने घट अपेक्षित असली, तरी एकूण पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात ०.३१ टक्क्याची वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कृषी विभागाने सादरीकरण केले.

या बैठकीला कृषी, फलोत्पादन आणि सहकार विभागाचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे संचालक, चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म विकासमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री अतुल सावे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Sugarcane
Sugarcane Payment : ऊस उत्पादकांची देयके पंधरा दिवसांत द्या ; अन्यथा आंदोलन

यंदा उसाचे क्षेत्र १३५७.५४ लाख हेक्टर होते, त्यात घट होऊन हे क्षेत्र १०८६.५३ लाख हेक्टरवर येण्याची शक्यता आहे. यंदाची उत्पादकता ९१.२४ असून, त्यात ९७.०३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात किरकोळ वाढ होणार असली, तरी उत्पादकतेत १४.४ टक्क्यांनी वाढ होणार आहे. भाताचे क्षेत्र १५.५५ लाख हेक्टरवरुन १५.९१ लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज असून, उत्पादकतेत १८.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कापसाचे क्षेत्र ४२.२९ लाख हेक्टरवरून ४१.६८ लाख हेक्टरवर जाणार असून, उत्पादकतेत १.९ टक्क्याने वाढ अपेक्षित आहे.

खरिपाचे अपेक्षित क्षेत्र : ५० लाख हेक्टर

उपलब्ध बियाणे (क्विंटल)

महाबीज : १,५१,४२९

राष्ट्रीय बीज निगम : ४०,३५०

खासगी : १२,९९,५४२

सोयाबीन बियाणे : १४,९१,३२१

ग्राम बीजोत्पादन मोहिमेअंतर्गत निवडलेले शेतकरी : ४, १०, ५९४

घरचे सोयाबीन मोहिमेतून उपलब्ध सोयाबीन बियाणे : ४२,३७,१०६

७५५ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

राज्यात बोगस खते विक्री केल्याप्रकरणी ७५५ परवाने निलंबित केले असून अवैध बियाणे विक्रीप्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यात ४८०२२ खत विक्रेते असून, ४५२३१ बियाणे, ४०६६९ कीटकनाशक विक्रेते आहेत.

१ एप्रिलपासून राज्यात ३९५ भरारी पथकांची निर्मिती केली असून, १८.४० टन खताचा साठा जप्त केला आहे. तर दीड महिन्यात २४ परवाने रद्द केले असून, पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Sugarcane
Sugarcane Harvesting : ऊसतोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई करणार

२९१३.०७ कोटींचा पीकविमा

राज्यातील १४ खरीप आणि ६ रब्बी पिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या पीकविमा योजनेअंतर्गत यंदा २९१३.०७ कोटी रुपयांचा विमा मिळाला आहे. २०२२-२३ मध्ये या योजनेत १०४.०७ लाख शेतकरी सहभागी झाले होते. ६२.९८ लाख हेक्टर क्षेत्राचा २९ हजार ८६८ कोटी रकमेच्या विमा संरक्षणापोटी ४६९१.५१ कोटी विमा हप्ता भरला होता.

२६.५५ लाख टन खतसाठा

राज्यासाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी ५० हजार टन युरिया आणि २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा करण्याचे नियोजन केले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी ४३.१३५ लाख टन खत मंजूर केले आहे. सध्या २६.५५ लाख टन खतसाठा उपलब्ध आहे.

‘पर्जन्यमापक यंत्रे अद्ययावत करा’

आढावा बैठकीला स्कायमेट कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत का, अशी विचारणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर ते अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या हंगामात काहीही करून शास्त्रीय पद्धतीने पंचनामे करून आपण मदत पोहोचविणार आहोत. यासाठी स्कायमेटची पर्जन्यमापक यंत्रे अद्ययावत असायला हवीत. अचूक पर्जन्यमापन होऊन त्यांचे रेकॉर्ड योग्य ठिकाणी नोंद झाले पाहिजे, याची दक्षता स्कायमेटने घेतली पाहिजे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

‘उशिराच्या पेरणीसाठी तूर, हुलगा, सूर्यफूल घ्या’

उशिरा सुरू होणाऱ्या पावसामुळे पेरणीचे योग्य नियोजन करा. उशिराच्या पेरणीमुळे गळीतधान्य व तृणधान्य पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी तूर, हुलगा, सूर्यफूल, एरंडी, राळा अशी पिके घ्या, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जुलैच्या पंधरावड्यापर्यंत बाजरी, सूर्यफूल तसेच हुलगा यांसारखी पिके चांगले उत्पादन देतात. परंतु मटकीसारखे पीक उशिरा पेरणीसाठी योग्य ठरत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com