Belgaum Ring Road : बेळगाव रिंग रोड भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक

Belgaum Ring Road : बेळगाव रिंग रोड भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक

Belgaum Ring Road Land Acquisition : कर्नाटकच्या बेळगावमधील शेतकऱ्यांनी येथे होणाऱ्या रिंग रोडच्या भूसंपादनाला तीव्र विरोध केला आहे. तसेच यावरून आता आंदोलन सुरू केले आहे.

Belgaum/Pune News : कर्नाटकातील बेळगाव (बेळगावी) येथे होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रिंग रोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच मागील अनेक वर्षांपासून विरोध करूनही प्रशासनाने भूसंपादनाची कार्यवाही सुरूच ठेवल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी (ता.२५) भूसंपादनाविरोधात आंदोलन करत शेतकऱ्यांनी उपायुक्तांना निवेदन देऊन भूसंपादनाची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी केली आहे.

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक पक्ष आप आपले उमेदवार कसे निवडणून येतील यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसह जमिनीसाठी लढत आहेत. असाच लढा सध्या दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणाचे शेतकरी देत आहेत. तर कर्नाटकातील बेळगावमध्ये देखील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादनाला विरोध केला आहे.

Belgaum Ring Road : बेळगाव रिंग रोड भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक
Land Acquisition Compensation : मोबदल्यासाठी बुडित क्षेत्रात झोपड्या

बेळगाव तालुक्यातील सुमारे ३० गावांतून बेळगाव रिंगरोड जाणार असून यासाठी १२५० हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाईल. तर या भूसंपादनामुळे वर्षाकाठी दोन ते तीन पिके येणाऱ्या सुपीक जमीन जाणार आहेत. यामुळेच रिंगरोडच्या नावाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन हिसकावून घेतली जात आहे. प्रशासनाने जमिनी घेण्याचा सपाटा लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी उपायुक्तांना निवेदन देताना, भूसंपादनाची प्रक्रिया थांबवावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.

Belgaum Ring Road : बेळगाव रिंग रोड भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक
Land Acquisition : जमिनीच्या मावेजासाठी शेतकऱ्यांचे लोह्यात आंदोलन

बेळगाव शहराचा सध्या झपाट्याने विस्तार होत असून येथे वाहतूक कोंडीची समस्या, दळणवळण, प्रादेशिक उद्यान, नागरी संकुले, औद्योगिक विकास होत आहे. यासाठी येथे शहराभोवती रिंग रोडची गरज असल्याचे येथील प्रशासनाचे म्हणणे आहे.

बेळगाव रिंग रोड

या रिंग रोडवर २७९२ कोटी रूपयांचा निधी खर्च केला जाणार असून याची लांबी ६९.४२७ कि.मी. आहे. तर शहापूर ते हालगापर्यंत हा बायपास होणार असून तो पुढे कमकारट्टी, कलखांब, बेन्नाळी (NH4 होनगा गावाजवळील) असा हा रिंगरोड जाणार असून हा रिंगरोड चारपदरी किंवा सहा पदरी असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com