Land Acquisition : जमिनीच्या मावेजासाठी शेतकऱ्यांचे लोह्यात आंदोलन

Farmer Protest for Land Acquisition Compensation : संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा तब्बल सात वर्षांपासून मिळाला नाही. या निषेधार्थ लोहा शहरातील बायपास फुलाजवळ वळणरस्ता बाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १५) रास्ता रोको आंदोलन केले.
Land Acquisition
Land AcquisitionAgrowon

Nanded News : राष्ट्रीय महामार्गातर्फे वळण रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा तब्बल सात वर्षांपासून मिळाला नाही. या निषेधार्थ लोहा शहरातील बायपास फुलाजवळ वळणरस्ता बाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १५) रास्ता रोको आंदोलन केले.

लोहा शहराजवळून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ जात आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. परंतु या जमिनीचा मावेजा मात्र मागील सात वर्षांपासून मिळाला नाही. यामुळे बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले.

Land Acquisition
Land Acquisition Compensation : जमिनीच्या मोबदल्याची १५ वर्षांपासून प्रतीक्षा

या वेळी रास्ता रोको आंदोलनाची दखल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ नांदेडची भूसंपादन अधिकारी शिवाजी देलमडे व लोह्याचे तहसीलदार राजेश पाठक यांनी घेऊन घटनास्थळी येऊन वळण रस्ता बाधित शेतकऱ्यांची चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून सदरील रस्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

Land Acquisition
Land Acquisition Compensation : शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला

या वेळी भूसंपादक अधिकारी शिवाजी देलवडे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर लवकरात लवकर न्यायालयात देऊन शेतकऱ्यांना मावेजा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. दुपारी तीन वाजता लोहा तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी शंकर लाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ठेवण्यात आली आहे.

एकंदरीत वळण रस्ता बाधित शेतकऱ्यांच्या या रस्ता रोको आंदोलनाला यश आले आहे. सदरील रास्ता आंदोलनाचे नेतृत्व रस्ता बाधित शेतकरी संघाचे अध्यक्ष माणिकराव व्यंकटराव चव्हाण यांनी केले. यावेळी विश्वंभर मगनाळे, गंगाधर सूर्यवंशी, राजू चव्हाण, रवी चव्हाण, सचिन चव्हाण, राहुल कापुरे, गणेश पवार, संग्राम चव्हाण, रामराव हरी चव्हाण उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com