
Buldana News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि शाश्वत सिंचनासाठी शासनामार्फत विविध योजनेअंतर्गत संधी उपलब्ध झाली आहे. आधुनिक शेतीकडे वाटचाल करत शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी जिल्ह्यातील हवामान व मातीचे पोत फळबाग लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी कृषी संबधित शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत अनुदानावर आधारित फळबाग लागवड योजनाचा शेतकऱ्यांनी अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लाभार्थ्यांसाठी पात्रता
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : मग्रारोहयोअंतर्गत लागवडीसाठी जॉबकार्ड असणे आवश्यक, मग्रारोहयोअंतर्गत लागवडीसाठी कमीत कमी ०.०५ हेक्टर व जास्तीत जास्त २.० हेक्टरपर्यंत शेतकऱ्यास लाभ देण्यात येतो. स्वत:च्या नावे ७-१२ व संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र, कुळाच्या नावे असल्यास कुळाचे संमतीपत्र, परंपरागत वन निवासी अधिनियमानुसार वनपट्टेधारक शेतकरी, किमान १० गुंठे जमीन आवश्यक. अल्प/अत्यल्प उत्पन्न, महिला, दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य, मग्रारोहयो अंतर्गत लागवडीसाठी ग्रामसभेत मंजुरी घेणे आवश्यक आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवड करतात पात्र ठरू शकत नाहीत, असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभ घेऊ शकतो. योजनेअंतर्गत लागवडीसाठी कमीत कमी ०.२० हेक्टर व जास्तीत जास्त ६.० हेक्टरपर्यंत शेतकऱ्यास लाभ देण्यात येतो.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना : सर्वसाधारण क्षेत्रासाठी ४० टक्के, अनुसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के २ हप्त्यांमध्ये ६०ः४० प्रमाणे, दुसऱ्या वर्षी ८० टक्के झाडे जिवंत असावीत क्षेत्रमर्यादा २ हेक्टरपर्यंत, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरीता किमान ०.४० हेक्टर क्षेत्र जमीन असणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावा
मग्रारोहया योजनेच्या लाभासाठी ग्रामपंचायात येथे अर्ज सादर करून त्याची ग्रामसभेमध्ये मान्यतेने लाभार्थीची निवड होते. लाभार्थ्यांनी अर्ज कृषी सहायकाकडे करावा. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळेचा अर्ज महाडीबीटी पोर्टलवर किंवा https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाईन अर्ज करावा.
लागवडीसाठी पिके
फळपिके - आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबू, शेवगा, हदगा, केळी (३ वर्षे), ड्रॅगनफ्रूट, ॲव्हाकॅडो, द्राक्ष, चंदन, तुती, करवंद, खजूर, हनुमान फळ
फुलझाडे - गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा
औषधी वनस्पती - पानपिंपरी, अर्जुन, असान, अशोका, बेहडा, हिरडा, बेल, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन
मसाल्याची पिके - लवंग, दालचिनी, मिरी, जायफळ, हळद
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.