Tur Cultivation : बळीराजाला मिळाला तुरीचा आधार

Tur Production : काही वर्षांपासून भातकापणी दरम्यान परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. नुकसान कमी व्हावे आणि अतिरिक्त उत्पादन व उत्पन्न मिळावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीची योजना कार्यरत आहे.
Tur
Tur Agrowon
Published on
Updated on

Wangaon News : यंदा खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने कापणीस तयार झालेली भातशेती अक्षरश: जमीनदोस्त झाली आहे. वाऱ्याचा वेगही जास्त असल्याने शेती खाचरात आडवी झाली आहे.

भातशेती कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने हातातोंडाशी आलेले पीक निघून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बांधावर लावलेल्या तुरीचा आधार मिळत आहे. डहाणू, तलासरी तालुक्यात बांधावर लावलेल्या झाडांची वाढ जोरदार होऊन तुरीच्या झाडांना फुले येण्यास सुरुवात झाली आहे.

Tur
Tur Cultivation : वेळेवर करा तूर लागवड

काही वर्षांपासून भातकापणी दरम्यान परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. नुकसान कमी व्हावे आणि अतिरिक्त उत्पादन व उत्पन्न मिळावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीची योजना कार्यरत आहे.

बांधावर तूरलागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळत आहे. त्यामुळे आता कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी भातबियाण्यांबरोबर तूर बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे.

परिणामी, तूरलागवड क्षेत्र वाढले आहे. तसेच रोजच्या आहारात मुबलक प्रमाणात प्रथिनांचा स्त्रोत असलेल्या कडधान्यांचा समावेशही झाला आहे. आदिवासी भागातील कुपोषणमुक्तीसाठी बांधावरील तूर लागवड योजनेचा फायदा होत आहे, असे मत डहाणूचे तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाचपुते यांनी व्यक्त केले. यावर्षी भातशेतीच्या तुलनेत तुरीची वाढ चांगल्या प्रकारे झाली असून, चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा, शेतकरी व्यक्त करत आहेत.

Tur
Tur Cultivation : बेडवर लागवडीमुळे पावसातही तूर बचावली

शेतकऱ्यांना प्रोत्साहन

राज्य सरकार कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आदी माध्यमातून भातबियाणे वाटप करण्यात येते. तर आत्मा अंतर्गत यावर्षी एकरी २५० ग्रॅम बियाणे भातशेतीच्या बांधावर तुरीच्या लागवडीसाठी विनामूल्य वाटप करण्यात आल्यामुळे यंदा तुरीच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तुरीची वाढ जोमदार असून, फलधारणा होण्यास सुरुवात झाली आहे.

अतिशय उपयुक्त पीक

कडधान्यांमध्ये तुरीचे पीक हे सर्वांत महत्त्वाचे असून, आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी, पाण्याची बचत करण्यासाठी, जमिनीचा कस सुधारणे व टिकून ठेवण्यासाठी, इतकेच नाही तर शाश्वत शेतीसाठीही तूर अतिशय उपयुक्त आहे. पिकाच्या मुळांवर ग्रंथीत रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्याने या पिकाच्या नत्राची गरज बऱ्याचशा प्रमाणात परस्पर भागवली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com