Farmers Study Tour : शेतकरी विदेश दौरे अचानक रद्द

Agriculture Department : विदेशातील आधुनिक शेती दाखविण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे जाणारे दौरे अचानक रद्द करण्यात आले आहेत.
Farmers Study Tour
Farmers Study TourAgrowon
Published on
Updated on

Pune News : विदेशातील आधुनिक शेती दाखविण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे जाणारे दौरे अचानक रद्द करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनीच घोळ घालून हेतुतः दौरे रद्द केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कृषी विभागावर संताप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अत्याधुनिक शेतीची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यापेक्षा दौऱ्याच्या निविदा कंत्राटात काहींना रस होता. तसेच, या दौऱ्यांमध्ये राजकीय नेते व अधिकाऱ्यांचे नातेवाईक घुसवायचे होते. मात्र, कंत्राट आणि नातेगोते याचे गणित न जमल्याने अधिकाऱ्यांनीच घोळ घालत दौरे रद्द केले.

या बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आम्ही दाद मागणार आहोत. शासनाने योजना मंजूर केली व निधीदेखील दिला होता. मात्र, कृषी विभागाने योग्य नियोजन केले नाही. ऐन मार्चअखेर घाईघाईने शेतकऱ्यांना युरोप दौरा होणार नसल्याचे आधी कळविले गेले.

त्यानंतर बॅंकॉकला जाऊ असे कळविले. यामुळे शेतकरी संभ्रमात पडले होते. परंतु, तरीही शेतकरी मिळेल तेथे जाण्यास तयार होते. मात्र, कृषी विभागाने घोळ वाढवत गेला. अखेर दौरे रद्द करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

या बाबत कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे की, आधीच्या योजनेनुसार शेतकरी किमान बारावी पास असावा व वयोमर्यादा वय वर्षे २५ ते ६० असावी हे प्रमुख निकष होते. मात्र, कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये या निकषांत बदल करण्यात आला आहे. किमान शिक्षणाची अट व कमाल वय साठ वर्षे ही अट रद्द करण्यात आली आहे.

महिला शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळावी या उद्देशाने आता या योजनेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेत सन २०२४-२५ मध्ये युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व थायलंड या देशांची परदेश अभ्यास दौऱ्याकरिता निवड करण्यात आली होती.

सन २०२५-२६ या वर्षात युरोप, इस्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाइन्स व दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी निवडीचे निकषात बदल केल्यामुळे आधीच्या शेतकऱ्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. मात्र, आधी निवड झालेले शेतकरी पुन्हा अर्ज करू शकतात व पात्रतेनुसार त्यांचाही विचार केला जाईल.

Farmers Study Tour
Agriculture Damage : मुसळधार पावसाने पेरणीपूर्वीच शेतीचे नुकसान

ट्रॅव्हक्लिक कंपनीला कंत्राट

‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही राज्य पुरस्कृत योजना २०२४-२५ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या दौऱ्याचे कंत्राट कृषी विभागाने ट्रॅव्हक्लिक डेस्टिनेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले होते. हे कंत्राट नेमके कोणी कसे दिले याविषयी अधिकारी माहिती देण्यास तयार नाहीत.

Farmers Study Tour
Agriculture Commodity Market : कापूस, मूग, सोयाबीन, तुरीमध्ये घसरण

मात्र, ही कंपनी शेतकऱ्यांना युरोप, ऑस्ट्रेलिया, ब्राझील व थायलंडमध्ये घेऊन जाणार होती. शेतकरी निवडण्यासाठी राज्यस्तरीय समिती तयार करण्यात आली होती. तर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर शेतकऱ्यांची निवड करून देशांचे पसंतीक्रमदेखील कृषी आयुक्तालयाने गेल्या वर्षी मागविले होते. त्यानंतर १६० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली व त्यांना कळविण्यातदेखील आले.- शेतकरी राजीव जावळे, मु.पो. कोनड खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा

विदेश दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया पारदर्शक झाली होती. आम्हाला आधुनिक शेती बघायला मिळणार याचा आनंद झाला होता. गावोगावी आमचे आदर सत्कारदेखील झाले. मात्र, या दौऱ्यात काहींना अधिकारी व राजकीय नेत्यांचे नातेवाईक घुसवायचे होते. ते शक्य न झाल्यानेच दौरे रद्द केले गेले. शेतकऱ्यांसोबत थट्टा करण्याची सवय सरकारी यंत्रणेला लागली असून आम्ही या बाबत सरकार आणि न्यायालयात दाद मागणार आहोत.
- शेतकरी राजीव जावळे, मु.पो. कोनड खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com