Fodder Crop : रब्बीत चारा पिकावर भर

Rabi Season : उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये, म्हणून रब्बी हंगामात चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे.
Fodder Crop Management
Fodder Crop ManagementAgrowon

Pune News : उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये, म्हणून रब्बी हंगामात चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. त्यामुळे चारा पिकाच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

पुणे विभागात आतापर्यंत एक लाख ६६ हजार ९८८ हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत. येत्या काळात जनांवरासाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून उन्हाळ्यात भासणारी चाराटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

गेल्या वर्षीही पुणे विभागात जवळपास एक लाख ५० हजार हेक्टरच्या आसपास चारा पिकाची पेरणी झाली होती. यंदा त्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशी, बैल अशा जनावरांचे संगोपन करतात.

Fodder Crop Management
Fodder Crop : रब्बीत चारा पिकांना प्राधान्य

जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरवा चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्याटप्याने उपलब्ध होतो.

याशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाच्या वाड्याचा वापर चारा म्हणून करतात. याशिवाय सुका चारा म्हणून वाळलेले वाडे, मका, कडवळ अशा विविध पिकांचे नियोजन करून वापर करतात.

पुणे विभागासह राज्यात गायी, म्हशी, शेळ्या, कालवडी, बैल यांची जवळपास तीन ते साडे कोटी एवढी जनावरांची संख्या आहे. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी चारा टंचाईमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली नसली त्यापूर्वी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ आली होती.

Fodder Crop Management
Fodder Crop : चारा पिकांमध्ये मिळवली स्वयंपूर्णता

पुन्हा तशीच स्थिती उद्भवू नये, म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहे. त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मका पिकांसारख्या चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा फायदा बहुतांशी शेतकरी घेत चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा पिकांचे उत्पादन मिळते.

पुणे विभागात पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक --- झालेली पेरणी

मका -- ६७,३७५

कडवळ -- ३५,६५८

बाजरी --- ६३५

लुसर्नग्रास --- १४,२४७

नेपिअरग्रास -- ९,६०८

इतर चारा पिके -- ३९,४६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com