
Parbhani News : यंदा खुल्या बाजारातील कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्यामुळे सीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) केंद्रावर कापूस विक्रीस अधिक शेतकऱ्यांची अधिक पसंती आहे. गुरुवारपर्यंत (ता. १६) परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ‘सीसीआय’च्या ११ केंद्रांवर ७ लाख ८० हजार ५३३ क्विंटल तर खासगी ३ लाख ८ हजार ५४९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
या दोन जिल्ह्यांत सीसीआय आणि खासगी मिळून एकूण १० लाख ७२ हजार ९२२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयकडून एमएसपीने परंतु ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४७१ रुपये दर देण्यात आले. खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची प्रतिक्विंटल ६५०० ते कमाल ७३०० रुपये दराने करण्यात आली.
राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोनअंतर्गत यंदा परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, ताडकळस, हिंगोली, वसमत, जवळाबाजार या ११ ठिकाणच्या २० जिनिंग कारखान्यांमध्ये सीसीआयतर्फे किमान आधारभूत किंमत दराने कापूस खरेदी केली जात आहे. गुरुवारपर्यंत (ता. १६) परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवरील १७ जिनिंग कारखान्यांमध्ये ६ लाख ६७ हजार १४१क्विंटल कापसाची खरेदी झाली.
हिंगोलीतील ३ केंद्रांवर १ लाख ११ हजार ३४२ क्विंटल कापूस खरेदी झाली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत ४४ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू आहे.
गुरुवारपर्यंत (ता. १६) परभणी जिल्ह्यातील ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये २ लाख ८६ हजार ९०२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७१४० रुपये दर मिळाले. हिंगोली जिल्ह्यात ५ जिनिंग कारखान्यांमध्ये २१ हजार ६४७ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ७३०० रुपये दर मिळाले, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.
परभणी-हिंगोली जिल्ह्यांत कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
सीसीआयची खरेदी
केंद्र ठिकाण...जिनिंग संख्या...कापूस खरेदी...दर रुपये
परभणी...२...३९५७४...७००० ते ७२००
जिंतूर...१...१३३३००...७१०० ते ७४२१
बोरी...२...१०६६७९...७१७२ ते ७४७१
सेलू...५...९४७४४...७१७२ ते ७४७१
मानवत...३...१६८३३५...७१२४ ते ७४२१
पाथरी...१...२१५३३...७१७२ ते ७४२१
गंगाखेड...२...७३१३८...७१२४ ते ७४२१
ताडकळस...१...२९५३८...७२४६ ते ७४२१
हिंगोली...१...३४५०३८...७१२४ ते ७४२१
वसमत...१...१६१६०...७१५० ते७४७१
जवळा बाजार...१...६२७२९...७१७० ते ७४४१
खासगी कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)
बाजार समिती...जिनिंग संख्या...कापूस खरेदी...दर रुपये
परभणी...४..४१०९८...७१०० ते ७३१५
जिंतूर...४...११५६५...६५०० ते ६९००
बोरी...१...३५५४...६९०० ते ७१००
सेलू...६...३५६१९...६९०० ते ७१६५
मानवत...१३...११५०३८...७०७५ ते ७३००
पाथरी...२...११९८१...६८५० ते ७०५०
सोनपेठ...१...१९०४९...७००० ते ७२५०
गंगाखेड...६...४००५...७०७५ ते ७३००
ताडकळस...२...८६९३...६९०० ते ७१००
हिंगोली...४...१८५७५...६९०० ते ७१५०
जवळा बाजार...१...३०७२...६९०० ते ७१००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.