Village Road
Village RoadAgrowon

Village Road Issue : शिवेचा रस्त्यावर मालकी कुणाची असते?

Rural Development : एका गावात उत्तमराव नावाचा एक शेतकरी राहत होता. उत्तमरावची शेतजमीन दोन गावांच्या शिवेच्या कडेला होती. शिवेच्या रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून उत्तमरावाच्या जमिनीच्या शेजारच्या शिवेचा रस्ता बुजवून टाकला होता.

Village Issue : एका गावात उत्तमराव नावाचा एक शेतकरी राहत होता. उत्तमरावची शेतजमीन दोन गावांच्या शिवेच्या कडेला होती. शिवेच्या रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून उत्तमरावाच्या जमिनीच्या शेजारच्या शिवेचा रस्ता बुजवून टाकला होता.

त्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांची ये-जा करायची गैरसोय होत होती. पण ज्या शेतकऱ्यांनी हा रस्ता बुजवून टाकला होता, ते धनदांडगे शेतकरी होते. या धनदांडग्या शेतकऱ्यांपुढे गावातील इतर शेतकऱ्यांचे काही चालत नव्हते.

शेतजमिनीतील शिवेचा रस्ता किती रुंद असतो, याची माहिती गावातील तलाठ्याकडून घेण्याचा उत्तमरावने प्रयत्न केला. पण तलाठ्याला सुद्धा याबाबत काही माहिती नव्हती. उत्तमरावला गावातील एका शिक्षित शेतकऱ्याने सांगितले, की उत्तमराव तुम्ही मोजणी खात्याच्या कार्यालयात याबाबत चौकशी करा.

Village Road
Farm Road : चाळीस वर्षे बंद असलेले शेती, पाणंद रस्ते केले खुले

तुम्हाला तेथून सगळी माहिती मिळेल. उत्तमराव त्या शेतकऱ्याच्या सांगण्यानुसार मोजणी कार्यालयात गेला. त्याने भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज केला. उत्तमरावच्या अर्जाचा विचार करून मोजणी कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करण्यात आली. आणि उत्तमरावला शिवेची सर्व मोजमापे देखील मिळाली.

सर्व्हे नंबरचा गावचा नकाशा व रस्त्याची शंखू साखळीची मापे विचारात घेऊन उत्तमराव व इतर काही शेतकऱ्यांनी शिवेचा रस्ता खुला करण्यासाठी मामलेदार कोर्टात केस दाखल केली. मामलेदार कोर्टात केस जवळपास २ ते ३ महिने चालल्यानंतर शेवटी मामलेदार कोर्टाने निकाल दिला.

Village Road
Agriculture Land : पडीक जमिनी कोणाच्या?

मामलेदार कोर्ट ॲक्टच्या तरतुदीखाली वहिवाटीचा रस्ता काही धनदांडग्या शेतकऱ्यांनी अडविला असून, तो रस्ता १५ दिवसांत खुला करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. तहसीलदारांचा आदेश मिळाल्यानंतर उत्तमराव व त्याचे सोबतचे इतर शेतकरी फार आनंदी झाले !

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे शिवेचा रस्ता कोणी अडविला तर तो रस्ता पुन्हा सुरू करता येतो. त्यासाठी तहसीलदार यांच्याकडे मामलेदार कोर्ट ॲक्टच्या तरतुदीनुसार अर्ज करणे गरजेचे आहे. दोन गावांच्या मध्ये जमाबंदीच्या वेळी शिवेचा रस्ता ठेवण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com