
Palghar News : पाणीटंचाईसारख्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोखाड्यातील शेतकऱ्यांनी मोगरा फुलवला होता. उन्हाळ्यात डोक्यावरून हंडाभर पाणी आणून मोगरा जगवला होता.
चांगला बाजारभाव मिळेल, अशी आशा होती, मात्र कल्याण, दादर आणि नाशिकच्या फुल बाजारात ३० ते ४० रुपये किलो असा कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे त्यांच्या हाती उत्पादन खर्च तर सोडा, वाहतुकीचा खर्चही हाती येत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोगरा रस्त्यावर फेकला, तर काहींनी नदीत सोडून दिला आहे.
मोखाड्यात केवळ खरिपाचेच पीक पावसाच्या पाण्यावर घेतले जाते. पर्यायी उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा, म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने मोगरा लागवड केली आहे.
तालुक्यात सुमारे १५० एकरावर मोगरा लागवड आहे. मोखाड्यात दररोज सात ते आठ क्विंटल मोगरा उत्पादन निघते. यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे काही अंशी स्थलांतराला आळा बसला आहे.
तालुक्यात वाहतूक व्यवस्था नसल्याने, वेगवेगळ्या भागातून दुचाकीवरून शेतकरी मोगरा आणून तो कल्याण, दादर आणि नाशिकच्या फुल बाजारात पाठवतो, मात्र सर्वच फुल बाजारात मोगऱ्याचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खोडाळा-वाडा मार्गाच्या कडेला मोगरा फेकून दिला, तर काहींनी डोळ्यांत अश्रू आणत गारगई नदीपात्रात सोडून दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.