Crop Compensation : नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

MLA Sudhir Parve : माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह त्यांनी भिवापूर तालुक्‍यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी केली.
MLA Sudhir Parve
MLA Sudhir ParveAgrowon

Nagpur News : नागपुर जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) व रविवार (ता. ११) असे दोन दिवस झालेल्या पाऊस, गारपिटीमुळे सुमारे ९१५० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तब्बल ३६३ गावे यामुळे बाधित झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी दिली. माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह त्यांनी भिवापूर तालुक्‍यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी केली.

MLA Sudhir Parve
Unseasonal Rain : विदर्भात ३८ हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका

भिवापूर तालुक्‍यातील मांडवा, सेलोटी, वाकेश्‍वर, जवळी, लोणारा, आलेसूर, चिखलापार, पिंपर्डा या गावांना शनिवार तसेच रविवारी झालेल्या पाऊस, गारपिटीचा मोठा फटका बसला.

MLA Sudhir Parve
Nashik Water Storage : एकीकडे दुष्काळाची चिंता, दुसरीकडे अवकाळीचा हाहाकार; नाशकात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हं

गहू, हरभरा, मिरची, संत्रा या पिकांचे मोठे नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले. त्याची दखल घेत माजी आमदार सुधीर पारवे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी केली.

या वेळी त्यांच्यासोबत रवींद्र मनोहरे, उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर तसरे, तहसीलदार कल्याण दहाट, तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे, राजोलाचे आनंद राऊत, मंडळ कृषी अधिकारी दिप्तांषु तिजारे, विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते. नुकसानीपोटी तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com