Wildlife Management : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ‘रास्ता रोको’

Farmer Demands : कोवळी पिके फस्त करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, पीक संरक्षणाच्या काटेरी कुंपणासाठी अनुदान द्यावे, पीककर्ज माफ करावे.
Farmer Agitation
Farmer Agitation Agrowon
Published on
Updated on

Latur News : कोवळी पिके फस्त करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, पीक संरक्षणाच्या काटेरी कुंपणासाठी अनुदान द्यावे, पीककर्ज माफ करावे व अन्य मागण्यांसाठी बुधवारी (ता. १०) शिरूर अनंतपाळ व चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उदगीर ते लातूर रस्त्यावर दुपारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. डिगोळ व चामरगापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कोवळी पिके रानडुक्कर आणि हरिण फस्त करीत असल्याने त्यांच्या तावडीतून पिकांना वाचवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. दरवर्षी या वन्यप्राण्यांची संख्या वाढत असून दुसरीकडे वन विभागाकडून नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी मदत देण्यात येते.

Farmer Agitation
Wild Animal Crop Damage : खानदेशात पिकांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

या पार्श्‍वभूमीवर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा शेतीला काटेरी कुंपणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, यासह वंचित शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, गेल्या वर्षीच्या पीकविम्याची भरपाई द्यावी, गायीच्या दुधाला किमान चाळीस रुपये लिटर भाव द्यावा, प्रत्येक ग्रामपंचायतीवर पर्जन्य मापक यंत्र बसवावे, शेतकरी व शेतमजुरांच्या पाल्यांना मोफत उच्चशिक्षण द्यावे, शेती उत्पादनाला चांगला भाव द्यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Farmer Agitation
Farmer Agitation : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देवणीत ‘रास्ता रोको’

मागण्यांचे फलक हातात घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्यांच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. कमाल मर्यादेच्या प्रमाणात मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा गिते यांनी या वेळी सांगितले.

आंदोलनात बस्वराज नीला, अमर माडजे, अशोकराव पाटील, राजकुमार बिरादार, शिवाजी पेठे, रामेश्‍वर चावरे, ऋषिकेश बद्दे, राहुल कांबळे, बालाजी महाराज, तानाजी दांडगे, उमाकांत बोळेगा‌, दिलीप ढोंबळे, बाळासाहेब केंद्रे, बाबूराव मुंढे, उत्तम गुणाले, ज्ञानोबा इंद्राळे, रामकिशन गडिमे, मलिकाजून सगरे बोळेगाव, महेश निवाळी साकोळ, भानुदास धुमाळे, प्रदीप पाटील साकोळ, मदन तांबोळकर, गुंडेराव चौसष्टे, वैजनाथ तोंडारे येरोळ, अण्णाराव पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com