Water Leakage
Water Leakage Agrowon

Water Pollution : बंधाऱ्यातील गळती, दूषित पाण्यामुळे शेतकरी त्रस्त

Contaminated Water : नीरा नदीमधील बंधाऱ्यांची गळतीची समस्या, या पाण्यात रसायनमिश्रित दूषित पाणी येत असल्याने कांबळेश्वर (ता.बारामती) आदी भागातील शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
Published on

Baramati News : नीरा नदीमधील बंधाऱ्यांची गळतीची समस्या, या पाण्यात रसायनमिश्रित दूषित पाणी येत असल्याने कांबळेश्वर (ता.बारामती) आदी भागातील शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या समस्येवर प्रशासनाच्या वतीने कायमच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने शेतकरी आणि गावकरी त्रस्त झाले आहेत.

बारामती तालुक्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा पाऊस न झाला नाही. दुष्काळी परिस्थितीला आत्तापासूनच नीरा नदीकाठच्या गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, घाडगेवाडी, नीरावागज, मेखळी आदी ठिकाणचा समावेश आहे. एका बाजूला पाण्याची टंचाई, तर दुसऱ्याबाजूला कांबळेश्वरसारख्या बंधाऱ्यामधील उपलब्ध पाण्याची होत असलेल्या गळतीने शेतकरी अस्वस्थ आहे.

Water Leakage
Water Pollution : रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे इंद्रायणी फेसाळली; शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

याशिवाय बंधाऱ्यामध्ये येत असलेल्या दूषित पाण्याचा प्रश्न तर त्याहून भयंकर आहे. माजी सभापती कऱण खलाटे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर होत नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांवतीने शेतकऱ्यांच्या समस्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होतात. परंतु त्या प्रयत्नाला पाहिजे तेवढे यश येत नाही.

Water Leakage
Contaminated water supply : सव्वाशे गावांना दूषित पाणीपुरवठा
यंदा दुष्काळी स्थिती गंभीर आहे. उपलब्ध पाणी उन्हाळ्यापर्यंत पुरवाचे आहे. तसे केले तरच जनावरांसाठी चारा पिके, ऊस जगवणे शक्य होणार आहे. अन्यथा बागायत पट्ट्यातसुद्धा चारा छावण्या सुरू कराव्या लागतील. त्यासाठी प्रशासनाने योग्य कार्यवाही करून कांबळेश्वर बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबवावी. तसेच सांगवी बंधाऱ्यामधील दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा.
- संतोष जाधव, शेतकरी

बंधाऱ्यामध्ये पाणी आहे, परंतु गळती आणि प्रदूषणामुळे त्या पाण्याचे नियोजन कसे करावे, ते कळत नाही. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी खरे तर या समस्येवर निर्णायक भूमिका घेतली पाहिजे.`` दरम्यान, माळेगाव कारखान्याचे संचालक सुरेश तावरे यांनीही बंधाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी भूमिका मांडली.

Water Leakage
Water Pollution : ममदापूरमध्ये दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com