Framers Protest : ‘लाल वादळा’च्या आंदोलनाचा तिढा कायम

Farmers Issue : ‘‘२०१८ पासून आंदोलन करूनही सरकारचा अनुभव कटू असल्याने जोपर्यंत मागण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू होत नाही.
Agriculture
AgricultureAgrowon

Nashik News : ‘‘२०१८ पासून आंदोलन करूनही सरकारचा अनुभव कटू असल्याने जोपर्यंत मागण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू होत नाही. तसेच प्रश्न सुटतील अशी खात्री पटत नाही, तोपर्यंत इथेच थांबून प्रतीक्षा करणार आहोत,’’ अशी भूमिका ‘लाल वादळा’च्या आंदोलनाचे प्रणेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी घेतली.

वनजमिनीच्या प्रमुख मागणीसह एकूण १८ मागण्यांसाठी सोमवारपासून (ता.२६) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या ‘लाल वादळा’च्या आंदोलकांशी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (१ मार्च) सायंकाळी मुंबईत बैठक झाली. यावेळी झालेली चर्चा व मांडलेल्या मागण्या पुढील

तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, शनिवारी (ता.२) पुन्हा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी आंदोलन मागे घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला. मात्र प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू होत नाही. प्रश्न सुटतील अशी खात्री पटेपर्यंत आम्ही इथेच थांबून प्रतीक्षा करणार आहोत, असे गावित यांनी सांगितले.

Agriculture
Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन गुरुवारपर्यंत स्थगित

वनहक्क दाव्याअंतर्गत कसणाऱ्याचे नाव सात-बारा उताऱ्यावर लावण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारपासून (ता.२६) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.

या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी (१ मार्च) शिष्टमंडळाला चर्चेसाठी मुंबईत पाचारण केले. मंत्रालयात सायंकाळी झालेल्या या बैठकीला पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह शिष्टमंडळाचे प्रमुख माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. डी. एल. कराड आदी उपस्थित होते. मात्र कार्यवाहीबाबत अनुकूलता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका आंदोलकांची दिसून आली.

Agriculture
Farmers Protest : ‘डब्लूटीओ’विरोधात बळिराजाचा एल्गार

‘‘आम्ही कोणाचेही नुकसान करत नाही. आमच्याला कुठलाही धाक दाखवला, कुठलीही चौकशी लावली तरी मागे हटणार नाही. बैठकीत माहिती घेतली असता काही प्रश्न राज्य सरकारकडे मार्गदर्शनासाठी पाठवले आहेत. कांदा, अंगणवाडी, सेविका असे प्रश्न केंद्र सरकारकडे पाठविलेले आहेत. काम युद्ध पातळीवर करू, असे आश्वासन आम्हांला देण्यात आले. आंदोलन स्थगित करण्याची विनंती झाली; मात्र आम्ही आजवर पाच ते सहा दिवस आंदोलनाला बसलो आहोत,’’ असेही ते म्हणाले.

‘आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न सोडवा’

‘‘प्रशासनाची महसूल, वन अशा विभागांची यंत्रणा कामाला लागली, अशी आम्हाला खात्री पटली. तर आम्ही परत मार्गाने जाऊ. मात्र फक्त आश्वासन नको तर कामासंदर्भात गाडी रुळावर यायला हवी. आम्हाला घर बांधून इथे थांबायचे नाही, तर आमच्या लोकांचे जीवन-मरणाचे प्रश्न सोडवा,’’ अशी भूमिका गावित यांनी बैठकीनंतर मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com