Accident Insurance Scheme : शेतकरी अपघात विमा योजना साडेचार कोटींचे अनुदान वितरित

Scheme Grant Distributed : सांगली जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तब्बल २३१ प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालयाकडून वर्षभरात मंजूर झाले आहेत
Gopinath Munde accident insurance
Gopinath Munde accident insuranceAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तब्बल २३१ प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालयाकडून वर्षभरात मंजूर झाले आहेत त्यातून साडेचारकोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे, तर ४० प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मागीलवर्षी दहा तालुक्यांतून २७१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी २३१ प्रस्ताव मंजूर झाले असून उर्वरित ४० प्रस्ताव प्रक्रियेत आहेत.

शेतीत काम करताना शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटाला सामोरे जावे लागते. शेतीमध्ये अहोरात्र काम करताना काही प्रसंग शेतकऱ्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. शेतात काम करताना कधी मानवी तर कधी नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या जिवास धोका निर्माण होतो. अशावेळी संबंधित कर्त्या शेतकऱ्याचे काही बरे वाईट झाल्यास संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते.

Gopinath Munde accident insurance
Farmer Accidental Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचे १८० प्रस्ताव मंजूर

गरीब शेतकऱ्यांचे मेडिक्लेम, पॉलिसी, टर्म इन्शुरन्स पॉलिसी नसते. ऐनवेळी घरातील कर्त्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू होणे किंवा जायबंदी झाल्यास त्या कुटुंबावर मोठा आघात होतो. आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अशा वेळी संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आर्थिक मदत आवश्यक असते.

त्यासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली, खातेदार असलेल्या किंवा खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तीला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तर ही या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतात.

Gopinath Munde accident insurance
Farmer Accidental Insurance : शेतकरी अपघात विमा योजनेसाठी २३ कोटींवर निधी उपलब्ध

रस्ता व रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना विषबाधा, खून, उंचावरून पडून मृत्यू, जनावरांचा हल्ला, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक अशा नैसर्गिक अपघातांमुळे तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे येणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकन्यांचा मृत्यू होतो. किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचा वारस म्हणून तलाठ्याने गाव नमुना नं. ६ क नुसार घातलेली वारस नोंद, शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, प्रथम माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करायची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अशी मिळते मदत...

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, अपघातात दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.

तालुका कृषी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची कागदपत्रांची छाननी करून तत्काळ हे प्रस्ताव मार्गी लावले जातात.
विवेक कुंभार, अधीक्षक, जिल्हा कृषी कार्यालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com