Budget 2024 : 'अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काही येईल असं वाटत नाही' : तुपकर

Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ लोकसभेत आज सादर केला. यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या पीक काढणीनंतर होणारे नुकसान कमी झाले पाहीजे. तर जास्तीचं उत्पादन देणाऱ्या वाणांच्या निर्मितीसाठी संसाधन आणि कृषी तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी असे म्हटले आहे.
Budget 2024
Budget 2024Agrowon

Pune News : आज गुरूवार (१ रोजी) सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे अख्या देशाचे लक्ष लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांसह शेतकरी, युवक आणि महिलावर्गाला खूश करणाऱ्या घोषणा केल्या. त्यावरून आता राजकारण तापलेले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. यादरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील जोरदार टीका केली आहे. त्यांनी अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काही येईल असं वाटत नाही असे म्हटले आहे.

तसेच, हा अर्थसंकल्प केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सादर केला गेला आहे. शेतकऱ्यांच्या हातात काही येईल असं वाटत नाही असे स्पष्ट मत तुपकर यांनी मांडले आहे. त्याचबरोबर त्यांनी, मागील दहा वर्षांतील अर्थसंकल्पाचे ऑडिट करायला हवे; जेणेकरून मागील अर्थसंकल्पात घोषणा केल्या, त्यांची किती अंमलबजावणी झाली हे कळेल, असेही म्हटले आहे.

Budget 2024
Budget 2024 Live: केंद्र सरकारच्या तेलबिया अभियानामुळे शेतकऱ्यांना फायदा: अर्थमंत्री सीतारामण

अर्थमंत्री सीतारामन यांनी काय म्हटले?

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, तेलबियात भारताला आत्मनिर्भर करू असे म्हटले आहे. तसेच त्यांनी, २०२२ वर्ष हे देशाता आत्मनिर्भर तेलबिया अभियान सुरू करण्यात आल्याचे सांगितले आहे. तर त्याचा फायदा हा मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ आणि भूईमूग ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना झाला आहे. तसेच नॅनो युरियाच्या बाबतीतही शेतकऱ्यांना प्रोत्साहन सरकारने देण्याचे काम केल्याचे म्हटले होते.

मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

दरम्यान या बजेटवर सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांकडून समर्थन केले जात आहे. तर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावरून 'हा' अर्थसंकल्प म्हणजे जादूच्या प्रयोग असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच त्यांनी, अशा फसव्या अर्थसंकल्पाची आम्हाला गरज नसून मोदी सरकारचा 'हा' शेवटचा अर्थसंकल्प असेल असे म्हटले.

Budget 2024
Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची मोठी निराशा ; किसान सभेची टीका

दिवास्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न

तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील यावरून, देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपकडून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रोटी, कपडा आणि मकान देणारे हे मोदी सरकार

दरम्यान या अंतरिम अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे मोदी सरकार आणि आजचा अर्थसंकल्प हा रोटी-कपडा-मकान देणारे असल्याचे म्हटले आहे. तसेच या अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com