Ravikant Tupkar : आठवड्यात शेतकऱ्यांना पीक विमा द्या, अन्यथा 'सळो की पळो'करून सोडू; तुपकरांचा सरकारला इशारा 

Tupkar Mehakar Shetakari Akrosh Morcha : शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकरी आक्रोश मोर्चा काढत सरकारला इशारा देताना आठ दिवसांचा अवधी दिला आहे. 
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी आपली वेगळी चूल मांडली. तसेच 'महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी'च्या स्थापना करत मेहकर येथे सोमवारी (ता.२९) शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. या पहिल्याच आंदोलनातून सरकारला आठ दिवसांचा अवधी देताना १००% पिकविमा व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. याबरोबरच जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड देण्याची देखील मागणी तुपकर यांनी केली. तर मागण्या मान्य न केल्यास सरकारला 'सळो की पळो'करून सोडू असा तुपकर यांनी इशारा दिला आहे. 

पीक विमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेत मेहकर येथे विराट मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चात दिलेल्या घोषणांनी मेहकर शहर दणाणून सोडले. यावेळी तुपकर यांनी आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा करा. अन्यथा राज्य सरकारला हादररुन सोडू असा इशारा दिला. 

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : 'काय कारवाई करायची ती खुशाल करा!'; तुपकरांचे थेट राजू शेट्टींना आव्हान

सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत असून सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे. तर शेतकऱ्यांच्या या मागण्या आजच्या नसून त्यासाठी अनेकदा आंदोलने केली. मात्र सरकार निगरगठ्ठ असून सरकारला शेतकऱ्यांकडे कानाडोळा करायचा आहे. त्यामुळेच सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे तुपकर म्हणाले. 

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : 'मी अपक्ष नाही, ...तर शेतकऱ्यांचा उमेदवार'!; तुपकर आज अर्ज दाखल करणार

तसेच सरकार जर शेतकऱ्यांचा विचारच करणार नसेल तर सरकारला जागे करण्यासाठी आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आल्याचे तुपकर म्हणाले. तर सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस पावले न उचलल्यास राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. तर याची सुरूवात मेहकर येथूनच करू असेही तुपकर म्हणाले. 

तर निर्णय घेतला नाही व आठ दिवसांचा आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करावा, अन्यथा राज्य सरकारला हादरुन सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करताना केला, शिवाय या आंदोलनाची सुरुवात मेहकरातून करु, असेही तुपकर यांनी सांगितले.

तसेच तुपकर यांनी जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड देण्यासह वन्यप्राण्यांनी शेतपिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन सरकारने सहकार्य करावे, सोयाबीन-कापसाच्या भावाचा फरक मिळावा, घरकुलाचे रखडलेले पैसे देण्यासह शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा करावी अशा मागण्या रविकांत तुपकर यांनी सरकारकडे केल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com