Sanjay Rathod : शेतकरी कंपन्या-समूहांनी जलसंधारण क्षेत्रात काम करावे

Water Conservation : शेतकरी कंपन्या व समूहांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कार्य करीत भुगर्भातील जलसाठ्यात वाढ होईल याकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी केले.
Sanjay Rathod
Sanjay RathodAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : शेती क्षेत्रात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही बाब विचारात घेता शेतकरी कंपन्या व समूहांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कार्य करीत भुगर्भातील जलसाठ्यात वाढ होईल याकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी केले.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत दिग्रस तालुक्‍यातील दोन क्‍लस्टरमध्ये २१ गावातील पाणलोटाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये शेतकरी कंपनी व समूहाच्या माध्यमातून पाणलोटाची कामे होणार आहेत. तुपटाकळी येथे या शेतकरी कंपनी व समूहाच्या कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Sanjay Rathod
Delhi Farmers Protest : दिल्ली आंदोलनावर शेतकरी ठाम ; शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारची धावाधाव

आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून याकरिता दोन शेतकरी कंपन्या व ५० शेतकरी समूहाची स्थापना करण्यात आली आहे. ना. राठोड म्हणाले, सध्या भूगर्भातून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असताना त्या तुलनेत पाणी जिरविण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. यातून भविष्यात मोठे धोके निर्माण होणार आहेत. त्यावर मात करण्यासाठी भूजल पातळी कशी वाढेल त्यावर सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे.

Sanjay Rathod
Bharat Ratna Award : शेतकऱ्यांच्या कैवाऱ्याचा 'भारत रत्न'ने सन्मान ; कोण होते चौधरी चरणसिंह?

त्यासाठी जलपुनर्भरणाचे प्रयोग आणि उपक्रम सातत्याने राबवावे. पाणलोट क्षेत्र विकासाकरिता नियोजित आराखड्यानुसार काम झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्मा प्रकल्प संचालक संतोष डाबरे, शेती सह्योग कंपनीचे संचालक, वाई मेंढी, तुपटाकळी लाख रायजी, लोणी या गावातील सरपंच, पाणलोट समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाणलोट योजनेअंतर्गत शेतकरी समूहांना कृषी प्रक्रिया उद्योग, अवजार बॅंक, शेती शेती निविष्ठा विक्री केंद्र या करिता ५० टक्‍के अनुदान उपलब्ध होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनीसाठी तीन वर्षाच्या कामकाजाची तरतूद करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com