Farm Electric Pump : शेतीचे विद्युत पंप चोरून विकायचे, पोलिसांनी केलं जेरबंद

Electric Pump : शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी कॅनॉलवर लावलेल्या विद्युत पंप चोरणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Farm Electric Pump
Farm Electric Pumpagrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture News : शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी कॅनॉलवर लावलेल्या विद्युत पंप चोरणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अनिकेत आप्पासो शिंदे (वय १९), शुभम सुनील चौगले (वय २६, दोघे रा. निगवे खालसा, ता. करवीर), प्रथमेश शहाजी मांडवकर (२२, रा. वाळवे खुर्द, कागल) अशी या संशयितांची नावे आहेत. चोरीचे पंप विकण्यासाठी आले असताना तिघांना संभाजीनगरात सापळा रचून पकडले.

संशयित आरोपी चोरीच्या मोटारी शहरात विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांना मिळाली होती. त्यांनी डी. बी. पथकाचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकाला रवाना केले.

संशयास्पद टेम्पोसह संभाजीनगर परिसरात आलेल्या तिघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या तिघांनी चौकशीत दहा दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील कॅनॉलवरून मोटारी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, सहा मोटारी आणि टेम्पो असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Farm Electric Pump
Water Shortage Kolhapur : लोकसभेच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाई, नेते लक्ष घालणार का?

पोलिस हवलदार गजानन गुरव, अमर पाटील, सागर डोंगरे, सतीश बांबरे, परशुराम गुजरे, संदीप नाईक, योगेश गोसावी, गौरव शिंदे, प्रशांत घोलप यांनी कारवाईत सहभाग घेतला.

तिघेही संशयित शाळेपासूनचे मित्र

तिघेही संशयित शाळेपासूनचे मित्र आहेत. चैनीसाठी तिघांनी मोटारी चोरण्याचा उपद्व्याप केला. स्वतः शेतकऱ्यांची मुले असणाऱ्या या तिघांनी शेतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या विद्युत मोटारींवर डल्ला मारला. या चोऱ्यांमुळे संबंधित शेतकऱ्यांचा कामाचा घोळ झाला होता. जुना राजवाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com