Fertilizer Stock Seized : कोल्हापुरात बनावट खत साठा जप्त; कृषी विभागाची कारवाई

Fake Fertilizer Stock Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या खुपिरे येथे कृषी विभागाने बनावट खत विक्री होत असल्या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
Fertilizer Stock Seized
Fertilizer Stock Seizedagrowon
Published on
Updated on

Kolhapur Fertilizer Stock Seized : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे (ता.करवीर) येथे कृषी विभागाने बनावट खत विक्री प्रकरणी रविवारी (ता.९) कारवाई केली. रंकभैरवी या कृषी सेवा केंद्रात १०:२६:२६ (एनपीके) या रासायनिक खताच्या ७७ बनावट खतांच्या बॅग सापडल्या आहेत. कृषी केंद्र चालक आकाश गणपती नाळे (रा. सांगरूळ) याच्यावर करवीर पोलिसांत अत्यावश्यक सेवा कायदा, खते नियंत्रण कायदा व रासायनिक खते कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून कारवाई दरम्यान १ लाख २५ हजार रुपये किंमतीची बनावट खते जप्त करण्यात आली आहेत.

यावेळी कृषी उपसंचालक एन. एस. परीट यांनी दिलेल्या माहितीनुसार, "खत विक्रेत्यांनी फायद्यासाठी गुणवत्तेशी तडजोड करू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे." अशी माहिती परीट यांनी दिली.

पोलिस आणि कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाकडून खत व औषध तपासणी मोहीम सुरू आहे. याअंतर्गत खुपिरे येथे कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर आकाश नाळे याचे रंकभैरव नावाने शेती सेवा केंद्र आहे. अचानक रंकभैरव शेती सेवा केंद्रामध्ये अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली.

Fertilizer Stock Seized
Fertilizer subsidy : नॅनो खतांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवण्याचा विचार नाही; केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांची माहिती

तपासणी दरम्यान खताच्या बॅगची तपासणी करत असताना पारादीप फॉस्फेट लिमीटेड या खताच्या बॅगमध्ये १०:२६:२६  ऐवजी दुसरे खत भरले असल्याचा संशय आला. बॅग तपासणी करत असताना 'प्रिंटिंग मिस्टेक' असल्याचे लक्षात आले. १०:२६:२६ या खताच्या बॅगचा दर १७२० रुपये आहे. बॅगवर एमआरपी १६५० रुपये होती. यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी अधिकची चौकशी केली. चौकशी दरम्यान बनावट व दुसऱ्याच कंपनीचे खत या बॅगमध्ये भरल्याचे अधिकाऱ्यांच्‍या निदर्शनास आले.

यावेळी केंद्र चालकाला जाब विचारला असता ८० बॅग आल्या होत्या. यातील तीन बॅगा विकल्या असून ७७ बॅग स्टॉकमध्ये असल्याचे सांगितले. सदर प्रकरणात कृषी अधिकाऱ्यांनी बॅगची विक्री बंद आदेश दिले आहेत. तसेच खताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. ७७ बॅगही ताब्यात घेतल्या. या बॅगची रक्कम १ लाख २७ हजार रुपये आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी करवीर पोलिसांमध्ये केंद्र चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. करवीरचे पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन बनावट खतांच्या बॅगचा पंचनामा केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com