Crop Productivity : पीक उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर

Agriculture Investment : शेतीच्या क्षेत्रात या वर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Pandharpur News : शेतकऱ्यांना शेती फायद्याची व्हावी, यासाठी पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फणववीस यांनी पंढरपुरात कृषी प्रदर्शनाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात सांगितले. आगामी काळात शेतीच्या सर्व फीडरचे सौर ऊर्जीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर असल्याबाबतही त्यांनी कौतुक केले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री जयकुमार गोरे, पणनमंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजित मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजित पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.

Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis: मराठीचा उत्सव नव्हे, रुदालीचे भाषण: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलनियोजनपासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातला छोट्यातला छोट्या शेतकऱ्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल असा प्रयत्न करण्यात आला आहे.

शेतीच्या क्षेत्रात या वर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदी देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Agriculture Success Story: महिला शेतकरी कंपनीपर्यंत रेवतीताईंचा प्रवास...

कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, की वारकरी आणि शेतकरी हे वारीच्या दोन बाजू आहेत. शेतीत येणाऱ्या तंत्रज्ञानाची वारीत सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी चांगले प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उत्तम शेती होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या प्रदर्शनात सुमारे २५० स्टॉलच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, पीएमएफएमई योजना, आत्मा, स्मार्ट प्रकल्प आदींची माहिती उपलब्ध आहे, या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.

कृषी निविष्ठांपासून ‘एआय’पर्यंतचे तंत्रज्ञान

दरवर्षी आषाढी वारीच्या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात येते, यंदाही यामध्ये शासनाचे विविध विभाग, कृषी विद्यापीठे यांचे स्टॉलसह वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचा यात समावेश आहे.

त्याशिवाय सेंद्रिय खते, नैसर्गिक खते, वेगवेगळ्या खतांचे मिश्रणे आदी कृषी निविष्ठांसह माती परीक्षण ते कापणीपर्यंतच्या वेगळगवेगळ्या तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळते. शिवाय एकात्मिक कीड नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआचा वापराबाबतच्या माहितीचाही स्टॉल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com