Process Industries : प्रक्रिया उद्योगासाठी दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखा...

Dairy Technology : दुग्ध तंत्रज्ञान विषयामध्ये बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) या पदवीधरांना चांगली संधी आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने पदवीधरांना रोजगार तसेच नोकरीच्या चांगल्या संधी आहेत.
Dairy Technology
Dairy Technology Agrowon
Published on
Updated on

डॉ. पी. जी. वासनिक

Government Job : दुग्ध तंत्रज्ञान शाखेचा पदवी अभ्यासक्रम हा बारावीनंतर चार वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अन्न व दुग्ध प्रक्रिया क्षेत्रातील खासगी तसेच शासकीय क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

दुग्ध तंत्रज्ञान विषयामध्ये बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) या पदवीधरांना चांगली संधी आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने पदवीधरांना रोजगार तसेच नोकरीच्या चांगल्या संधी आहेत.

दुग्ध प्रक्रिया व मूल्यवर्धनासाठी दुग्ध तंत्रज्ञांची मागणी वाढत आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंर्तगत वरूड (पुसद) आणि उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय कार्यरत आहे. या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ३२ विद्यार्थी इतकी आहे.

प्रवेश प्रक्रिया पात्रता

- अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी एमएचटी- सीईटी पात्रता प्रवेश परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

- बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी या विषयांत एकत्रित खुल्या प्रवर्गाकरिता ५० टक्के व राखीव प्रवर्गाकरिता ४० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

- विद्यार्थ्यांच्या पालकाकडे शेती असल्यास ७/१२ चा उतारा वा सक्षम प्राधिकरणाच्या भूमिहीन शेतमजुराच्या प्रमाणपत्रावर १२ गुण जोडण्यात येतात.

Dairy Technology
Dairy Business : दूध व्यवसायाच्या गुणात्मक वाढीसाठी अभ्यासगट

अभ्यासक्रम

अभ्यासक्रम चार वर्षांचा असून, आठ सत्रांमध्ये विभागला आहे. यामध्ये चार प्रशिक्षणांचा समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.टेक. (दुग्ध तंत्रज्ञान) पदवी प्रदान करण्यात येते.

प्रमुख विभाग

दुग्ध तंत्रज्ञान, दुग्ध अभियांत्रिकी, दुग्ध सूक्ष्मजीवशास्त्र, दुग्ध रसायनशास्त्र, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन

वेबसाइट

बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) ऑनलाइन प्रवेश आणि माहितीपुस्तिकेसाठी www.mafsu.ac.in या वेबसाइटवर भेट द्यावी.

महत्त्वाची तारीख

५ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाइन प्रवेशपक्रिया सुरू असणार आहे.

रोजगाराच्या संधी

पदवीधरांना जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, शासकीय दुग्धशाळेतील पदे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न महामंडळ,

राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळ, विद्यापीठात सहायक प्राध्यापक, भारतीय कृषी संशोधन परिषदेत संशोधक तसेच बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी आहे. तसेच सहकारी, खासगी दूध संध तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये देश, परदेशांमध्ये पदवीधरांना चांगली संधी आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग, न्यूट्रास्यूटिकल्स पदार्थ निर्मिती, पुरवठा साखळी व्यवस्थापन, खाद्यपदार्थ निर्मिती उद्योगामध्ये स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत.

संपर्क - डॉ. पी. जी. वासनिक, ९४२२८६६५१९, (अधिष्ठाता, दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखा, माफसू, नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com