Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत रशियन तंत्रज्ञानाचे फिरते धान्य स्वच्छता (क्नीनिंग), विलगीकरण (सॉर्टिंग), प्रतवारी (ग्रेडिंग), बियाणे प्रक्रिया (सीड प्रोसेगिंग) यंत्र खरेदी करण्यात आले आहे.
हे यंत्र ट्रॅक्टरच्या साह्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. शेतावरच कमी वेळेत धान्याची, स्वच्छता, प्रतवारी करणे शक्य होते, अशी माहिती कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या यंत्राचे उद्घाटन रविवारी (२९ ऑक्टोबर) करण्यात आले.
या यंत्राच्या उद्घाटण प्रसंगी या वेळी जबलपूर येथील तणविज्ञान संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. जे. एस. मिश्रा, रायपूर येथील राष्ट्रीय जैविक तनाव प्रबंधन संस्थेचे सहसंचालक डॉ. अनिल दीक्षित, ‘आयएआरआय’चे वनस्पती शरीर विज्ञानाचे विभागप्रमुख डॉ. रेणू पांडे, एलमाझ रशियाचे सीईओ अलेक्साई लायस्कोह, डॅनियल ओगोरोडोव,
सहयोगी संचालक डॉ. एस. पी. मेहत्रे, प्रभारी अधिकारी (बियाणे प्रक्रिया) डॉ. एस. बी. घुगे, डॉ. हिराकांत काळपांडे, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. गोपाळ शिंदे, नोडल अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, अग्रोनेस्ट प्रा. लि.चे सचिन गुणाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, की या यंत्राव्द्वादारे अति जलद गतीने बियाणे स्वच्छ करून प्रतवारी करणे शक्य असून, याची क्षमता प्रतितास ४ टन आहे. हे यंत्र पूर्णपणे वायुगतिकीय तत्त्वावर चालते. त्यासाठी केवळ ३ एचपी विद्युतप्रवाहाची आवश्यकता आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार या यंत्रात बदल करण्यात आला आहे. या वेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, प्रगतिशील शेतकरी पंडित थोरात, जर्नादन आवरगंड, रामेश्वर साबळे, विजय जंगले, प्रकाश हरकळ, शास्त्रज्ञ आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.