Paddy Procurement : भात उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ पर्यंत मुदतवाढ

Chandrakant Khade : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी दिली.
Paddy Procurement
Paddy ProcurementAgrowon

Kolhapur News : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी दिली.

मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत खालील ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरू केली आहे. चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित (तुर्केवाडी), चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित (दाटे), आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी-विक्री संघ मर्यादित (आजरा),

Paddy Procurement
Paddy Procurement : भातखरेदी नोंदणीस मुदतवाढ

राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित (सरवडे), राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी-विक्री संघ मर्यादित (राशिवडे), कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उ‌द्योग खरेदी-विक्री संस्था मर्यादित (कोल्हापूर),

Paddy Procurement
Paddy Farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, नोंदणी करण्यास दिली मुदतवाढ

भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित (गारगोटी), भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी-विक्री संघ मर्यादित (गारगोटी), जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड (कोल्हापूर) या ठिकाणी नोंदणी सुरू आहे.

शासनाने FAQ प्रतीच्या धानासाठी (भात) २१८३ रुपये व रागीकरिता (नाचणी) ३८४६ रुपये प्रतिक्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर होती. परंतु शासन स्तरावरून शेतकरी नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली असून अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने भात व नाचणी विक्री करिता नोंदणी करावी, असे अवाहनही जिल्हा मार्केटिंग अधिकारी खाडे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com