
Solapur News : माढा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येवती येथील तलावावरील विद्युत पंपांना ४५ लाख रुपये खर्चून एक्स्प्रेस फीडर उपलब्ध झाल्याने सतत वीजपुरवठा खंडित होऊन माढा शहरावर वारंवार येणारे पाणी संकट यामुळे कमी होणार आहे. \
जिल्हा नियोजन समिती सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर या योजनेतून माढा नगरपंचायतीस पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी येवती येथील विद्युत पंपांना एक्स्प्रेस फिडरच्या माध्यमातून अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होण्याकरिता एक्स्प्रेस फीडरसाठी ४५ लाख इतका निधी उपलब्ध केला होता.
शुक्रवारी (ता. ६) या एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण होऊन नगराध्यक्षा मीनल साठे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, पाणीपुरवठा सभापती शबाना बागवान, सभापती रेश्मा लंकेश्वर, नगरसेविका मोहिनी नेटके, संगीता साठे, नगरसेवक अजिनाथ माळी, विकास साठे, नितीन साठे, शिवाजी जगदाळे, सुधीर लंकेश्वर, मुन्ना बागवान, सचिन रणदिवे, पापरी सबस्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
माढा शहराला येवती (ता. मोहोळ) येथील तलावात जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. येथील विद्युतपंपाचा वीजपुरवठा सारखा खंडित होत असल्याने पाइपलाइनला सारखी गळती लागून पाणीपुरवठा विस्कळित होत होता.
आता एक्स्प्रेस लाइनमुळे विद्युतपुरवठा सुरळीत झाल्यामुळे पाइपलाइनमधून गळतीचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे शहराला सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नगराध्यक्षा मीनल साठे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.