Soya DOC Export : सोयापेंड निर्यात जोमात;सोयाबीन आधार मिळेल का?

Anil Jadhao 

देशात सोयाबीनचे दर नरमल्यानंतर सोयापेंडचे दर सरासरी ४२ हजार रुपयांवर आले. सोयापेंडचे दर कमी झाल्याने निर्यातीसाठी पडतळ निर्माण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड ३८ हजार रुपयांवर आहे. मात्र ही सोयापेंड जीएम आहे. तर भारताची सोयापेंड नाॅन जीएम आहे. त्यामुळे भारताच्या सोयापेंडचे दर काहीसे जास्त असूनही निर्यात वाढली.

सध्या ब्राझीलमधून सोयापेंड निर्यातीचे दर ५८८ डाॅलर प्रतिटन आहेत. तर भारताची पेंड ५३५ डाॅलर प्रतिटनाने मिळते.

भारताच्या सोयापेंडचे मुख्य ग्राहक हे दक्षिण पूर्व आशियातील देश आहेत. या देशांना निर्यात करण्यासाठी भारताला लाॅजिस्टीकच्या दृष्टीने सोपे जाते. तसेच आपली सोयापेंड नाॅन जीएम असल्याने अमेरिका आणि युरोपातील काही देशांकडूनही मागणी असते.

नोव्हेंबरमध्ये १ लाख ६४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. तर मागीलवर्षी नोव्हेंबरमधील निर्यात १ लाख ३४ हजार टनांवर स्थिरावली होती. यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये देशातून ३ लाख २६ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. तर मागीलवर्षी याच काळतील निर्यात २ लाख १९ हजार टनांवर होती.

देशातून सोयापेंड निर्यातीसाठी पोषक स्थिती असल्याने निर्यात वाढू शकते. याचा फायदा देशातील सोयाबीनला मिळू शकतो. यंदा देशातून १५ लाख टनांपर्यंत सोयापेंड निर्यात होऊ शकते, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.

cta image
क्लिक करा