Agro Tourism : बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र

GreenZone Agrochem agri-tourism : पिंपळगाव बसवंत (ता. निफाड, जि.  नाशिक) येथील प्रकल्पात कृषी संस्कृती आणि मधू-पर्यटन यांची परस्परांशी सांगड घालणारा हा भारतातील पहिला प्रकल्प ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम’चे कार्यकारी संचालक संजय पवार यांच्या कल्पक नियोजनातून साकारला आहे.
Agro Tourism
Agro TourismAgrowon
Published on
Updated on

Baswant Agro Industry Tourism Center : पिंपळगाव बसवंत (ता. निफाड, जि.  नाशिक) येथील प्रकल्पात कृषी संस्कृती आणि मधू-पर्यटन यांची परस्परांशी सांगड घालणारा हा भारतातील पहिला प्रकल्प ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम’चे कार्यकारी संचालक संजय पवार यांच्या कल्पक नियोजनातून साकारला आहे. या केंद्रात वर्षभर विविध परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन केले जाते.

बसवंत मधमाशी उद्यान ः देशातील पहिले अ‍ॅपी टुरिझम सेंटर. मधमाशीचे मानवी आहार, आरोग्यामधील योगदान, पिकांची उत्पादनवाढ, स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्‍वत ग्रामविकासाची संकल्पना.

बीनिव्हर्स ः मधमाशीच्या शिल्पाकृतीचा उंच मनोरा पर्यटकांचे आकर्षण.

Agro Tourism
Agro Tourism : नियोजन, कष्टांतून साकारलेले मुलूख कृषी पर्यटन केंद्र

माहितीपट ः दोन भव्य टनेल्समध्ये मधमाश्यांचे निसर्ग आणि मानवी जीवनातील महत्त्व प्रदर्शित केले आहे. सातेरी, मेलिफेरा, ट्रायगोना वसाहती.

मधमाश्यांचे गाव ः शेतकरी एकत्र येऊन कसे मधमाशीपालन करू शकतात हे समजवणारी संकल्पना.

प्रशिक्षण ः मधमाशीपालन करू इच्छिणाऱ्यांना प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षणाची सुविधा.

सेवरगाव ः ‘गाव समृद्ध तर देश समृद्ध’ या संकल्पनेवर आधारित प्रतिकृती.

फळे, भाजीपाला, मधप्रक्रिया ः मध्यम स्वरूपाचे फूड प्रोसेसिंग युनिट.

गोमाता संस्कृती ः देशातील उत्कृष्ट दहा गोवंशाच्या प्रतिकृती. विविध बैलांची चित्ररूप माहिती.

ग्रामसंस्कृती ः ग्रामसंस्कृतीबद्दल रंजक माहिती देण्याचा प्रयत्न.

गेमझोन ः लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आनंद घेता येईल असे मैदानी, साहसी खेळ.

अ‍ॅक्वामीन ः माशांचे विविध प्रकार आणि संवर्धन करण्याच्या नवीन पद्धती.

जानोरी फ्लॉवर्स ः फुलांच्या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या संधींबद्दल माहिती.

ग्रेप सिटी ः द्राक्ष संग्रहालयामध्ये भोकरी, अनाब-ए-शाही, गुलाबी आणि शरद सीडलेस यासारख्या तीसहून अधिक जागतिक दर्जाच्या द्राक्षाच्या जातींची लागवड.

ससा संगोपन ः सशांचे नैसर्गिक जीवन पाहण्याचा आनंद.

गौरव

२०२२ मध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम संस्थेतर्फे ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम अ‍ॅवॉर्ड’.

२०२३ मध्ये संस्था श्रेणीमध्ये ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्कार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com