Panpimpali Farming : सातपुड्यात शेतकऱ्यांनी जपलाय औषधी पानपिंपळीचा वारसा

Mahesh Gaikwad

पानपिंपळीची शेती

सातपुडा या पर्वतीय प्रदेशातील शेतकरी अत्यंत मेहनतीतून औषधी पानपिंपळीची शेती करत आहेत.

Panpimpali Farming | Photo - Gopal Hage

औषधी वनस्पतीचे अस्तित्व

पानपिंपळी या औषधी वनस्पतीचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि जुन्या पिढीकडून मिळालेला हा वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे.

Panpimpali Farming | Photo - Gopal Hage

वेलवर्गीय औषधी वनस्पती

पूर्वी पानमळ्यांची लागवड करणारे आणि सिंचनाची सोय असलेले शेतकरी या वेलवर्गीय औषधी वनस्पती पिकाची शेती करायचे.

Panpimpali Farming | Photo - Gopal Hage

पानपिंपळी लागवड

मात्र गेल्या काही काळात या भागातील पानपिंपळीचे लागवड क्षेत्र अडीच हजार एकरहून अधिक झाले आहे.

Panpimpali Farming | Photo - Gopal Hage

पायपर लाँगम

शास्त्रीय भाषेत पायपर लाँगम असे नाव असलेल्या पानपिंपळीला पानपिंपरी, पिप्पल, टिपली, लेंडी पिंपरी अशा विविध नावांनीही ओळखले जाते.

Panpimpali Farming | Photo - Gopal Hage

मसालेवर्गीय उत्पादन

विविध औषधे आणि मसालेवर्गीय उत्पादनात पिंपळीचा वापर होतो. अकोला, बुलडाणा या भागांतील जमीन व हवामान या पिकाला पोषक मानली जाते.

Panpimpali Farming | Photo - Gopal Hage

उत्तरेकडील राज्यांत मागणी

पानपिंपळीला औषधी कारणांसाठी उत्तरेकडील राज्यांत मागणी असते. प्रामुख्याने दिल्ली भागातील व्यापारी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात.

Panpimpali Farming | Photo - Gopal Hage

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....