Agrowon Exhibition 2024 : प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा ‘ॲग्रोवन’’च्या प्रदर्शनात गौरव

Agriculture Exhibition : ॲग्रोवन’’च्या कृषी प्रदर्शनात शुक्रवारी (ता. १२) मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमधील प्रयोगशील युवा शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : 'ॲग्रोवन’’च्या कृषी प्रदर्शनात शुक्रवारी (ता. १२) मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमधील प्रयोगशील युवा शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

कृषी प्रदर्शनात ‘लढा दुष्काळाशी’ या विशेष चर्चासत्रादरम्यान या पुरस्कारांचे ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये ः नांदेड ः रत्नाकर ढगे, (सायाळ, ता. लोहा), हाणमंत तरपेवाड (मांजरमवाडी, ता. नायगाव), दिगंबर खपाटे (बाभळी, ता. धर्माबाद),

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ

संदीप देशमुख (कामनगाव, ता. भोकर), दत्तात्रेय कदम (धामधरी, ता. अर्धापूर). परभणी ः नृसिंह आळसे (ब्रह्मपुरी, ता. जि. परभणी), ऋषिल घुगे (केहाळ, ता. जिंतूर), सुदाम माने (पिंपरी देशमुख, ता. जि. परभणी), शिवानंद कंठाळे (बोरी, ता. जिंतूर), मीरा संजय यशके (पूर्णा, ता. जि. परभणी), हिंगोली ः कावेरी प्रल्हाद बोरगड (सातेफळ, ता. वसमत),

गंगाधर गुलाबराव कदम (तपोवन, ता. औंढा नागनाथ), अतुल राऊत (साखरा, ता. सेनगाव), लातूर : अनुराधा लालासाहेब सरवदे (पोहरेगाव, ता. रेणापूर), श्रीदेवी रविकिरण स्वामी (हरंगूळ खुर्द, ता. जि. लातूर), भाग्यश्री नीळकंठ यादव (बोरफळ, ता. औसा), सचिन साळुंके (खंडापूर, ता. जि. लातूर), राहुल डोके (खरोसा, ता. औसा) यांचा समावेश आहे.

आज यांचा होणार गौरव

या प्रदर्शनात शनिवारी (ता. १३) धाराशिव, बीड आणि जालना या जिल्ह्यांतील युवा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. गौरव करण्यात येणाऱ्यांमध्ये

धाराशिव : ऋषिकेश कोरे-पाटील (वडगाव देव, ता. तुळजापूर), अनिता लक्ष्मण जाधव (खंडाळा, ता. तुळजापूर), वैभव उंबरे (वानेवाडी, ता. जि. धाराशिव), सविता महादेव सालपे (बारूळ, ता. तुळजापूर), प्रियांका विजयकुमार वडणे (कुंभारी, ता. तुळजापूर), सचिन बिराजदार (भुसणी, ता. उमरगा), दयानंद मोटे-पाटील (अंजनसोंडा, ता. भूम).

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ अवतरला कृषी प्रदर्शनात

जालना : सुचिता दत्तात्रय शिनगारे (खेडगाव, ता. अंबड), रुक्मिणी विजय शेळके (वाल्हा, ता. बदनापूर), उषा श्रीकृष्ण दळवी (येवता, ता. जाफराबाद), श्रीकांत आखाडे (वालसावंगी, ता. भोकरदन), सीमा सदानंद क्षीरसागर (कडवंची, ता. जि. जालना), विद्या नारायण उजेड (अंतरवाली ता. जि. जालना), अंजना रवींद्र धांडे (दैठणा, ता. घनसावंगी), अश्विनी नामदेव मातणे (मोसा, ता. मंठा), प्रल्हाद बाळासाहेब बिडवे ( सातोना, ता. परतूर).

बीड : मंगल पाराजी कुरे (अंथरवन पिंप्री, ता. जि. बीड), सीमा जावेद सय्यद, (मुर्शदपूर, ता. आष्टी), उमा सुनील औटे (शिंदे नगर, कॅनॉल रोड, बीड), बाबूराव सलगर (मलनाथपूर, ता. परळी), राजश्री तारळकर (श्रीपतरायवाडी, ता. अंबाजोगाई), शीतल रवींद्र देवरवाडे (देवाळा, ता. अंबाजोगाई), चंद्रप्रकाश मिटकरी (दवनापूर, ता. परळी), सचिन नाईकवाडे (पुसरा, ता. वडवणी) यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com