Temperature Update
Temperature UpdateAgrowon

Weather Update : हिवाळा अन् उन्हाळ्याचा एकाच वेळी अनुभव

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी पारा पस्तिशीपार आहे. तर पहाटेच्या वेळी किमान तापमान १० अंशांच्या खाली असल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात हुडहुडी कायम आहे.

Pune Weather News : राज्यात कमाल तापमानात (Temperature) वाढ झाली असून, दुसरीकडे किमान तापमानात घट होत असल्याची परस्पर विरोधी हवामान स्थिती आहे. यामुळे सध्या राज्यात एकच वेळी उन्हाळा अन हिवाळा ऋतूंचा अनुभव मिळत आहे.

पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाच्या तीव्र झळांमुळे घामटा निघत आहे. राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी पारा पस्तिशीपार आहे. तर पहाटेच्या वेळी किमान तापमान १० अंशांच्या खाली असल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात हुडहुडी कायम आहे.

बुधवारी (ता. १५) रत्नागिरी येथे देशातील येथे उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Temperature Update
Hawaman Update : राज्यात उन्हाळ्याची चाहूल; अकोल्यात उच्चांकी तापमान | ॲग्रोवन

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने हुडहुडी कायम आहे. धुळे, जळगाव, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे १० अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहेत.

कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानातील वाढ कायम आहे. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमान पस्तिशी पार आहे. सांताक्रुझ, सोलापूर आणि अकोला येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतातील राज्याच्या किमान तापमानातही सातत्याने चढ-उतार सुरूच असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. १५) उत्तराखंड येथील पंतनगर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १७) राज्याच्या तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.३ (८.४), जळगाव ३४.० (८.०), धुळे ३३.०(६.६), कोल्हापूर ३३.२(१७.६), महाबळेश्वर २९.६ (१३.८), नाशिक ३१.७ (९.६), निफाड ३२.१(५.४), सांगली ३४.४ (१४.७), सातारा ३३.७ (११.७), सोलापूर ३५.७ (१४.४), सांताक्रूझ ३५.५ (१८.४), डहाणू २९.६ (१७.३), रत्नागिरी ३८.३(१६.६), औरंगाबाद ३३.५ (९.४), नांदेड - (१४.०), परभणी ३३.६(१२.५), अकोला ३५.६ (१२.२), अमरावती ३४.२(१०.५), बुलडाणा ३१.२(१५.४), ब्रह्मपुरी ३३.६ (१५.०), चंद्रपूर ३१.२(१४.०), गडचिरोली ३१.६(१०.६), गोंदिया ३१.६ (१०.६), नागपूर ३२.९ (१२.६), वर्धा ३३.५(१४.०), वाशीम ३५.० (११.६), यवतमाळ ३२.३ (१०.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com