GI Product Exhibition : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जीआय उत्पादनांची अनोखी झलक

Maharashtra Sadan : दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
GI Tag Products
GI Fair Mumbai Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १३ जानेवारीपर्यंत हे विशेष प्रदर्शन सुरू राहणार आहे. यामध्ये पैठणी, लाल मिरची, आमचूर, कोल्हापुरी गूळ, मसाले, हळद आदी उत्पादनांचा समावेश आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील स्थानिक उत्पादनांचा समावेश असून, ग्रामीण भागातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील येवलेमधील भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले दिवटे पैठणी या दालनात पैठणी, सेमी पैठणी, हातमागाच्या साड्या तसेच पैठणीच्या जॅकेट, टोपी, हॅण्डबॅग ठेवण्यात आले आहेत.

GI Tag Products
Agriculture GI : अकोल्याच्या कागदी लिंबाला ‘जीआय’

नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव येथील बोंदवाडे मधील ‘आमु आखा एक से’ या शेतकरी उत्पादक कंपनीची आमचूर पावडर, तसेच या जिल्ह्यातील डॉक्टर हेडगेवार सेवा समितीतर्फे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेली भडक लाल मिरचीचे दालन आहे.

कोल्हापूरमधील कोल्हापूर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट येथील प्रसिद्ध गूळ, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे तयार होणारे तानपुरा आणि सितार यांनाही मानाची भौगोलिक मानांकन मिळालेले असून या वाद्यांची छोटी प्रतिकृती मांडलेली आहे. अकोला जिल्ह्यातील ग्रामपुत्रा जीविक शेती मिशन, शेतकरी उत्पादक कंपनी खापरवाडा यांचे सेंद्रिय मसाले आणि हळद यांचा समावेश आहे.

GI Tag Products
Turmeric GI : हळद ‘जीआय टॅग’ अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी माहिती द्यावी

अहिल्यानगर जिल्ह्यातील राधिका महिला बचत गट अंतर्गत तयार करण्यात येणारे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, शेंगदाणा, जवस, तीळ, कारळ यांच्या चटण्याही या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

या प्रदर्शनाची उद्‌घाटन प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक रवींद्र मोरे, महाराष्ट्र सदनच्या व्यवस्थापिका भागवंती मेश्राम, बांधकाम विभागाचे अभियंते जे. डी. गंगवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com