Agricultural Festival : कणेरीतील लोकोत्सवात पर्यावरणपूरक शेतीचा जागर

माती चांगली राहण्यासाठी पाचट कुजवणे, शेणखत व सेंद्रिय घटकांचा वापर केलेली शेती महत्त्वाची ठरते.
organic Farming
organic FarmingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : येथे सुरू असलेल्या ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवा’त (Sumangal Panchmahabhut Lokotsav) कृषी संपदा साकारली आहे. पारंपरिक शेती (Traditional Agriculture), पर्यावरणीय शेती, बरोबरच सेंद्रिय शेती (Organic Farming) पर्यावरणासाठी कशी महत्त्वाची आहे, हे सांगण्याचा प्रयत्न विविध विभागांतून करण्यात आला आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या विभागांतून पर्यावरणीय संदेश देण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात मातीची सुपीकता महत्त्वाची बनत चालली आहे.

organic Farming
Organic Farming : कणेरीत पंचमहाभूत लोकोत्सवात १२६ पिकांचे सेंद्रिय शेतीचे प्रात्यक्षिक

माती चांगली राहण्यासाठी पाचट कुजवणे, शेणखत व सेंद्रिय घटकांचा वापर केलेली शेती महत्त्वाची ठरते. यांत्रिकीकरणा बरोबर बैलांच्या सहाय्याने केलेली शेती किती महत्त्वपूर्ण ठरते. याबाबत प्रत्येक विभागात प्रतिकृतीच्या साहाय्याने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

organic Farming
Organic Farming: सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार

भविष्यात पर्यावरणपूरक शेती करणे महत्त्वाचे बनणार आहे. शेती करताना कोणतेही रासायनिक घटक शेतीत जाऊ नये यासाठी सेंद्रिय शेतीचे आवाहन या प्रतिकृतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

रासायनिक शेती, त्यातील धोके, हवेचे प्रदूषण आदी बाबी तपशीलवारपणे प्रतिकृतीतून मांडल्या आहेत. आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व याबाबतचे मार्गदर्शन सहभागी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com