Siddheshwar Sugar Factory : श्री सिद्धेश्वर कारखान्याच्या मदतीसाठी धावले उद्योजक

Sugarcane Crushing : यंदाच्या गाळप हंगामापूर्वी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी उभी करण्यासाठी राज्यासह परराज्यातील उद्योजकांनी अभियंत्यांसह कारखान्याकडे धाव घेतली आहे.
Siddheshwar Sugar Factory
Siddheshwar Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Solapur News : यंदाच्या गाळप हंगामापूर्वी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी उभी करण्यासाठी राज्यासह परराज्यातील उद्योजकांनी अभियंत्यांसह कारखान्याकडे धाव घेतली आहे.

हैदराबादच्या अभियंत्यांनी कारखान्याची नुकतीच पाहणी करून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, त्वरित उपलब्ध होणारी यंत्रणा आणि त्यासाठी लागणार खर्च याबाबत अहवाल कारखाना प्रशासनाला कळविला जात आहे.

दरम्यान, चिमणीच्या पाडकामानंतर देखील नव्याने पर्याय व्यवस्था उभी करून यंदाचा कारखाना गाळप हंगाम चालू करण्याच्या पार्श्वभूमीवर, होत असलेल्या गतिमान हालचाली पाहता, या कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या आशा पल्लवीत होत आहेत.

महापालिका प्रशासनाने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली. गाळप हंगामाच्या तोंडावर ही चिमणी पाडल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. वीज निर्मिती करणाऱ्या चिमणीवर कारखान्याची सर्व यंत्रणा अवलंबून असल्याने आजची स्थिती पाहता, पुढील दोन वर्षे गाळप थांबेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Siddheshwar Sugar Factory
Siddheshwar Sugar Factory : कारखान्याच्या चिमणीचा विषय सोडवा

तथापि, या घटनेनंतर राज्यातील व इतर राज्यातील उद्योजक अभियंत्यांनी धाव घेतली आहे. कारखाना सुरू करण्यासाठी कशा पद्धतीने तांत्रिक मदत करता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहे. चिमणी विना कारखाना चालविणे अशक्यच आहे, तर जुन्या चिमणी बंद अवस्थेत आहेत.

आजमितीला कारखान्यात असलेली मशिनरी आणि जुनी चिमणी यांची सांगड घालून किती क्षमतेपर्यंत गाळप करता येईल, याचाही अंदाज घेतला जात आहे.

आठशे वाहनांचे करार पूर्ण

दरवर्षी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील साधारण एक हजार वाहनांचा करार केला जातो. यंदाही १० जूनपूर्वी ८०० वाहनांचे करार पूर्ण करण्यात आले आहेत. तर मागील दोन वर्षी कारखान्याने तब्बल ८५ ते ९० हजार एकराची नोंद घेतली होती. यंदाही हा आकडा ७० हजार एकर इतकी आहे.

सिद्धेश्वर कारखाना बंद पडू नये, म्हणून विविध क्षेत्रातील उद्योजकांनी कशा पद्धतीने कारखाना सुरू राहील यासाठी मदत करीत आहेत. हैदराबादचे इंजिनिअरदेखील स्वत:हून येऊन पाहणी करून गेले. कारखाना उद्योगाशी निगडित असलेले, या तांत्रिक विषयाशी संबंधित असलेल्या लोकांकडून पाहणी केली जात आहे. परंतु यंदाचा हंगाम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा, लागणार खर्च, गाळप करता येईल का? याबाबतची परिपूर्ण माहिती मिळायला महिनाभर तरी लागेल.
धर्मराज काडादी, मार्गदर्शक संचालक सिद्धेश्वर साखर कारखाना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com